मुलुंडमध्ये कुणबी समाजाच्या महिलाशक्तीचा जागर: ‘जांभळ्या’ रंगात न्हाऊन निघाला हळदी-कुंकू सोहळा.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-कुणबी समाज विका स संघ (रजि.), मुलुंड आणि कुणबी समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी गोशाळा रोड परिसरात एका भव्य ‘हळदी-कुंकू’ समारंभा चे आयोजन करण्यात आले होते.
  • पारंपारिक संस्कृती आणि आधुनिक खेळांची मेजवानी असलेल्या या सोहळ्याला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.
  • एकता आणि शिस्त: सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे उपस्थित महिलांनी परिधान केलेल्या एकरंग जांभळ्या साड्या. यामुळे संपूर्ण परिसरात समाजाच्या एकतेचे दर्श न घडले.
  • दीपप्रज्वलनाने सुरुवात झाल्यानंतर महिलांनी पारंपारिक पद्धतीने वाण देऊन सणाचा आनंद लुटला.
  • ‘खेळ पैठणीचा’ आणि ‘सुहासिनींच्या नशिबाचा’ यांसार ख्या खेळांमुळे महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला.
  • कुणबी समाज विकास संघाचे अध्यक्ष विनायक घाणेकर, सरचिटणीस रविंद्र मांडवकर, शिवसेना महिला आघाडी च्या पदाधिकारी आणि भागणे प्रतिष्ठान महिला मंडळ आ णि परिसरातील शेकडो महिलांची उपस्थिती होती.
  • महिला संघटिका सौ.वैदही मांडवकर यांनी आपल्या प्र स्ताविक भाषणामध्ये प्रबळ समाज निर्मितीसाठी महिला संघटनेची वज्रमूठ आवश्यक का आहे हे सांगून महिला मंडळाच्या वर्षभरातील कार्यक्रमाचा आढावा सांगितला.
  • अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजातील महिला संघटि त होतात आणि एकमेकींना सहकार्य करण्याची भावना वाढीस लागते.” असं मत सौ.करुणाताई गावडे (अध्यक्षा, महिला मंडळ) यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
  • हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या का र्याध्यक्षा सौ.सेजल गोवले, सचिव सौ.प्रमिला घाणेकर, ख जिनदार सौ.रिटा पोवार तसेच सौ.संगिता पांढरे, मनाली पडेल,संजिवनी तांबट,संस्कृती जड्याळ, सविता नाचरे, श्वेता मांडवकर, सुलक्षणा घाणेकर, आशा रहाटे, आरती गोरिवले,अनिशा म्हादलेकर, सुशिला रहाटे, समिता बाईत, सेजल खळे, तेजस्वी भागणे, रेश्मा येद्रे, सोनाली जाधव, प्रियंका उके, बेबी सकपाळ,वैदही मांडवकर,राजश्री खोप टकर,स्वाती जड्याळ अहोरात्र मेहनत घेतली होती. कार्य क्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles