विरारमध्ये दुचाकी टोईंग ठेकेदाराची मनमानी – महेश कदम

  • प्रतिनिधी : नितीन राणे :- वसई–विरार शहर महानगर पालिका हद्दीत वाहतूक शिस्त लावण्यासाठी मनपा प्रशा सन व वाहतूक पोलिसांच्या समन्वयातून दुचाकी टोईंग धोरण राबवण्यात येत आहे.
  • स्टेशन परिसर तसेच मुख्य रस्त्यांच्या कडेला चुकीच्या ठि काणी उभी केलेली वाहने हटवण्यासाठी अधिसूचना जा री करून प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली.
  • सार्वजनिक रस्त्यावर उभी राहून वाहतुकीस अडथळा नि र्माण करणारी वाहने टोईंग करण्यासाठी खाजगी ठेकेदारा ची नियुक्ती करण्यात आली.
  • तसेच, वाहतूक कर्मचारी व ठेकेदार यांच्या संयुक्त पथका द्वारे सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात दुचाकी टोईंग करण्यात आल्या.
  • मात्र सामाजिक कार्यकर्ते महेश कदम यांच्या पाठपुराव्या मुळे मीरा–भाईंदर, वसई–विरार पोलीस आयुक्तालया कडून निश्चित पार्किंग व ‘नो पार्किंग’ ठिकाणी फलक ला वण्यात आल्याने नागरिक अधिक सतर्क झाले आहेत.
  • परिणामी सध्या टोईंग होणाऱ्या वाहनांच्या संख्येत लक्ष णीय घट झाली आहे.
  • दरम्यान, टोईंग केलेली दुचाकी ठेवण्यासाठी मनपाकडून विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यात आल्याने ठेकेदार व वाहतूक विभागाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
  • प्रति दुचाकी टोईंगमागे ठेकेदाराला 200 रुपये मिळत अ सून, वाहतूक पोलिसांकडून वेगळ्या स्वरूपात दंड आका रला जातो.
  • वाहन सोडवताना कागदपत्रे व परवाना तपासणी कायदे शीर असली तरी प्रत्यक्षात ‘चिरीमिरी’ला प्राधान्य दिले जा त असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
  • सध्या चुकीच्या ठिकाणी उभी असलेली वाहने कमी मिळ त असल्याने ठेकेदारांकडून इमारतींच्या आवारात, मॉल परिसरात तसेच सार्वजनिक वाहतुकीस कोणताही अडथ ळा न ठरणारी दुचाकीही टोईंग केली जात असल्याचे गं भीर प्रकार समोर आले आहेत.
  • विरार पूर्वेतील फुलपाडा, गुरुदत्त नगर येथील पाण्याच्या टाकीखाली अशा दुचाकी ठेवून ठेकेदाराकडून प्रति वाहन 200 रुपये पावतीने, तर वाहतूक शाखेकडून दंड स्वरूपा त 500 रुपये वसूल केले जात आहे.
  • ही संपूर्ण कारवाई नियमबाह्य, बेकायदेशीर व नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणारी असून, यात ठेकेदार व वाह तूक पोलिसांचे संगनमत असल्याचे स्पष्ट होते, असे महेश कदम यांनी म्हटले आहे.
  • वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीशिवाय ही कारवाई होऊ शकत नाही, हे वास्तव असून या प्रकारामुळे सामान्य ना गरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
  • या प्रकरणी संबंधित ठेकेदार तसेच त्यांना सहकार्य करणा ऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्यात येईल, असा इशारा महेश कदम यांनी दिला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles