
निगडीत ८५ शाळांच्या विद्यार्थ्यांचा ‘सूर्यनमस्कार’ जागर; सुवर्णपदक व प्रमाणपत्रांनी खेळाडूंचा गौरव.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,महाराष्ट्र शासन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी का र्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडर्न हायस्कूल, यमु नानगर(निगडी)येथे भव्य सूर्यनमस्कार प्रशिक्षण व जिल्हा स्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडली.
- या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील सुमारे ८५ शाळांमधील निवड क विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.

- याप्रसंगी पुणे जिल्हा समन्वयक श्रीप्रसाद देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सूर्यनमस्काराचे शारीरिक आणि मानसिक महत्त्व पटवून दिले.
- “सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम असून,विद्यार्थ्यांनी आ पल्या दैनंदिन जीवनात याचा समावेश केल्यास एकाग्रता आणि शारीरिक क्षमता वाढण्यास मदत होते,” असे त्यांनी नमूद केले.

- कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक मिलिंदभाऊ एकबोटे व मा. नगरसेवक प्रवीण जी भालेकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
- या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी श्री योग वर्ग (वाकड) आणि प्रेरणा योग प्रशिक्षण केंद्र (रुपीनगर) यांनी ‘स्पर्धा आयोजक’ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

- दिनेश काळे (राज्य समन्वयक), श्री. जगदीश टेकचंदानी (तालुका समन्वयक ) तसेच मास्टर ट्रेनर म्हणून योगिता तरडे व हिमानी राऊत, यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.
- स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेड ल (सुवर्णपदक) देऊन गौरविण्यात आले, तर सहभागी प्र त्येक विद्यार्थ्यास महाराष्ट्र शासन पुरस्कृत प्रमाणपत्र प्रदा न करण्यात आले.
- कार्यक्रमाच्या यशासाठी प्रमुख प्रायोजक म्हणून श्री.विका सजी मुंदडा (महेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशन),श्री.शशिकांत जी बेहेरे (ईंदू इन्फोटेक सोलुशन) आणि श्री. विजयजी धारप यांनी विशेष सहकार्य केले.

- कार्यक्रमाचे विनीत म्हणून श्री. देवा चित्राल आणि ॲड. पंकज चौधरी यांनी काम पाहिले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











