आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत – चौथा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट सोहळा-2026.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत पहिल्या,दुसऱ्या आणि तिसऱ्या राष्ट्रीय आणि आंत रराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या अभूतपूर्व यशानंतर आर्या र वी एंटरटेनमेंट तर्फे आता चौथ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्री य लघुपट सोहळ्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • सर्व लघुपट निर्मात्यांना विनंती करण्यात येत आहे की ते या लघुपट सोहळ्यामध्ये भारतातील आणि भारताबाहेरी ल कुठल्याही भाषेचे लघुपट पाठवू शकतात.
  • तसेच मराठी व हिन्दी लघुपट वगळता इतर भाषिक लघु पटांना इंग्रजी सबटायटल्स असणे बंधनकारक असणार आहे याची सर्व लघुपट निर्मात्यांनी नोंद घयायची आहे.
  • त्याचबरोबर लघुपट कालावधी जास्तीत जास्त 1 ते 30 मिनिटांचा असावा. या लघुपट सोहळ्यामध्ये सहभाग घेण्याची अंतिम तारीख 25 फेब्रवारी, 2026 असून यांत सर्वोत्कृष्ट तीन लघुपटांना रोख पारितोषिके व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
  • शिवाय इतरही वैयक्तिक रोख पारितोषिके आणि सन्मान प्रदान केले जाणार आहेत. तेव्हा सर्व लघुपट निर्मात्यांनी जानेवारी 2022 ते डिसेंबर 2025 ह्या कालावधी अंतर्गत चित्रित झालेले लघुपट पाठवावेत.
  • या लघुपट सोहळ्यामध्ये खालीलप्रमाणे रोख आणि अवॉ र्ड स्वरूपात पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
  • 1) प्रथम क्रमांक रोख पारितोषिक रु 25000/- आणि सन्मानचिन्ह
  • 2) द्वितीय क्रमांक रोख पारितोषिक रुपये.15000/- आणि सन्मानचिन्ह
  • 3) तृतीय क्रमांक रोख पारितोषिक रुपये.10000/- आणि सन्मानचिन्ह
  • 4) उत्कृष्ट अभिनेता/अभिनेत्री/बाल कलाकार रोख पारि तोषिक रुपये.2000/- आणि सन्मानचिन्ह 5) उत्कृष्ट दि ग्दर्शक रोख पारितोषिक रु 2000/- आणि सन्मानचिन्ह
  • 6) उत्कृष्ट संगीतकार रोख पारितोषिक रुपये.2000/- आणि सन्मानचिन्ह
  • 7) उत्कृष्ट संकलक पारितोषिक रुपये.2000/- आणि सन्मानचिन्ह
  • 8) उत्कृष्ट कथा/पटकथा/संवाद रोख पारितोषिक रुपये.2000/- आणि सन्मानचिन्ह
  • 9) उत्कृष्ट छायाचित्रण रोख पारितोषिक रुपये.2000/- आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे प्रवेश आणि फॉर्म साठी श्री.गुरुनाथ तिरपणकर – 9323662 619, श्री.राजू शेवाळे – 9321344860 आणि श्री.राम माळी – 8070009825 यांच्याशी संपर्क साधावा.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles