
पुन्हा टांगा पलटी करणार..!” – आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा विरोधकांना थेट इशारा.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- धाराशिवि जिल्हात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून सध्या राजकी य वातावरण चांगलेच तापले आहे.
- अनेक इच्छुक उमेदवार ‘गुडघ्याला बाशिंग’ बांधून आणि ‘पाण्यात देव ठेवून’ या पदासाठी देव पाण्यात घालून बस ले असतानाच, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी त्यांच्या या मनसुब्यांवर विरजण घालणारे खळबळ जनक विधान केले आहे.

- माध्यमांशी संवाद साधताना डॉ.तानाजी सावंत यांनी विरो धकांना २०२२ च्या राजकीय घडामोडींची आठवण करू न दिली.
- ते म्हणाले, “ज्याप्रमाणे २०२२ ला आम्ही ‘टांगा पलटी आ णि घोडे फरार’ केले होते, तसाच प्रकार यावेळीही घडल्या शिवाय राहणार नाही. जे कोणी आज सत्तेची स्वप्ने पाहत आहेत,त्यांचा टांगा पलटी केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.”

- सावंत यांच्या या विधानामुळे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्य ता वर्तवण्यात येत आहे.
- “आम्ही काय करू शकतो, हे गेल्या वेळी दाखवून दिले आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती यावेळीही होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- डॉ. तानाजी सावंतांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या इच्छु कांच्या गोटात अस्वस्थता पसरली असून, आगामी काळा त धाराशिव राजकारणात नेमकी काय ‘जादू’ घडते, याक डे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











