पुणे जिल्ह्यात शाळेतील खिचडीतून 60 विद्यार्थ्यांना विषबाधा
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- विद्यार्थ्यांना शाळेत दिलेला दुपारचा पोषण आहारच त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला आहे. पुण्यातील राजगुरुनगरमधील एका शाळेत तब्बल 60 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
-
रिपोर्टर : ज्ञानदेव गांडुळे :- राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुपारी पोषण आहार दिला जातो. विद्यार्थ्यांचं आरोग्य नीट राहवं म्हणून यात कडधान्यदेखील दिले जातात.
- मात्र विद्यार्थ्यांना दुपारी शाळेत दिलेला पोषण आहारच त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला आहे. पुण्यातील राजगुरुनगरमधील एका शाळेत तब्बल 60 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
- या सर्व विद्यार्थ्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. राजगुरुनगरमधील हुतात्मा राजगुरु विद्यालयात हा प्रकार घडला आहे.
- मुलांना दुपारच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. शाळेत रोज मुलांना दुपारी जेवणाच्या सुट्टीत खिचडी भात दिला जातो.
- आज देखील सुमारे 100 विद्यार्थ्यांनी हा खिचडी भात खाल्ला. त्यानंतर अर्ध्या तासांनी 60 मुलांना विषबाधा झाल्याचं समोर आलंं.
- भात खाल्यानंतर मुलांना मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाला. आज दुपारी सुमारे दोन वाजता हा प्रकार घडला आहे.
- तीन वाजता विषबाधा झाल्याचं समोर आलं. त्यानंतर लगेच सर्व विद्यार्थ्यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
- सुदैवाने सगळे विद्यार्थी सुखरुप असल्याची माहिती आहे.
- पालक संतापले…
- हा सगळा प्रकार पालकांना कळल्यावर पालक रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत चांगलात संताप व्यक्त केला आहे.
- शाळा प्रशासनावर ते चांगलेच संतापले होते. मुलांच्या जीवाशी खेळ करु नका, असं म्हणत पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
- सुदैवाने सगळे विद्यार्थी सुखरुप आहेत. मात्र 100 पैकी 60 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने सगळीकडून रोष व्यक्त केला जात आहे.
- आमच्या विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा आहे. त्यामुळेच आमच्या मुलांना त्रास झाला, असल्याचे पालकांकडून सांगण्यात आलं आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space