
कोळवणखडी (ता.राजापूर) येथे आज भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- मौजे कोळवणख डी ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवार दि १३ फेब्रुवारी २०२६ रोजी गावचरीचा माळ, श्री साई समर्थ पेट्रोल पंप शेजारी कोळवणखडी, ता राजापूर येथे सकाळी १० वाजता राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

- या स्पर्धेतील प्रथम १० विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत प्रथम क्रमांक रु २१,०००/- आणि ढाल, द्वितीय रु १५,०००/- व ढाल, तृतीय १२,०००/- व ढाल, चतुर्थ रु १०,०००/- व ढाल, पाचवा क्रमांक रु ८,०००/- व ढाल, सहावा रु ६,०००/- व ढाल, सातवा रु ५,०००/- व ढाल, आठवा क्रमांक रु ४,०००/- व ढाल,नववा रु ३,०००/- व ढाल आणि दहावा क्रमांक रु २,०००/- व ढाल अशी एकूण १० बक्षिसे देण्यात येणार आहेत.
- या स्पर्धेचे २ रे पर्व असून स्पर्धेच्या दिवशी सकाळी ८ ते ११ या वेळेत प्रवेश नोंदणी स्विकारली जाणार आहे.
- अधिक माहितीसाठी सुनिल गुरव – 9022524204, प्र तीक लाड – 7499402275, सुहास मोरे – 91451684 85, सुधाकर गुरव – 9892838923 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











