एल.सी.बी.ची मोठी कार्यवाही धाड टाकून ; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- वाशी तालुक्यातील मौजे दसमेगाव शिवारात अवैध अफू लागवड केल्याप्रकर णी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) बुधवारी (दि.११) ध डक कारवाई करत तब्बल ४८५.६५ किलो वजनाची, सु मारे ७२ लाख ८४ हजार ७५० रुपयांची अफूची झाडे जप्त केली.
  • या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, कांद्याच्या पिकात आंतरपीक म्हणून अफूची लागवड करण्यात आ ल्याचे उघड आले. हा प्रकार वाशी तालुक्यातील मौजे दशमेगाव शिवारात उघडकीस आला.
  • या प्रकरणी समाधान मनोहर उघडे(रा.दशमेगाव,ता.वाशी, जि.धाराशिव) याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गु न्हा दाखल करण्यात आला आहे.
  • यासंबधी सविस्तर माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांना गोपनीय माहिती मिळाली की, दशमेगाव येथील सर्वे क्रमांक १६३ मधील शेतात कांद्या च्या आंतरपिकामध्ये लपवून अफूची लागवड करण्यात आली आहे.
  • त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्ञ्जपवार यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
  • त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुद र्शन कासार व पथकाने संबंधित ठिकाणी भेट देऊन खा त्री केली असता, कांद्याच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पांढऱ्या-गुलाबी फुलांची व मोठ्या बोंडांची अफूची झाडे आढळून आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles