
कोळवणखडी येथे आज मोफत बांबू प्रशिक्षण कार्यक्रम.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- राजापूर तालुका बांबू उत्पादक शेतकरी ग्रुप व महाराष्ट्र प्रमोशन फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत कोळवणखडी शाळा नं १ येथे प्रगत बांबू लागवड आणि नर्सरी व्यवस्थापन यावर विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

- या प्रशिक्षणात बांबू रोपांची योग्य कलर कोडिंग (गुणवत्ते नुसार वर्गवारी) आणि आधुनिक नर्सरी व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
- या प्रशिक्षणात बांबू प्रजातींची निवड आणि लागवड, नर्स रीमध्ये रोप निर्मिती आणि संगोपन, कलर कोडिंगद्वारे रो पांची गुणवत्ता वर्गवारी, बांबू मार्केटिंग आणि नफा आदी विषयांवर श्री प्रशांत आत्माराम दाते नाशिक (लिमका बु क आणि इंडियन बुक रेकॉर्ड ने सन्मानित) आणि श्री पाट लोबा पाटील (PPBRF) कोल्हापूर हे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
- तरी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी आपली नावे १४ फेब्रुवारी पूर्वी नोंदवावीत अधिक माहितीसाठी सु हास शिवराम मोरे – 9145168485, वासुदेव घाग – 84 59437499, संदीप सरखोत – 9373643719, प्रतिक लाड – 7499402275 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन राजापूर तालुका बांबू उत्पादक शेतकरी यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











