
धाराशिव जिल्हा परिषद सत्तासंघर्ष भाजपा कडून सावंतांना दे धक्का…? का हात मिळवनी….?
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता अत्यंत रंजक वळणावर आली आहे.
- ‘महायुती’ला मतदारांनी कौल तर दिला, पण स्पष्ट बहुमत एकाही पक्षाला मिळालेलं नाही. अशा परिस्थितीत धारा शिव झेडपीवर वर्चस्व गाजवण्यासाठी भाजपनं आपली कंबर कसली असून, अध्यक्षपदाची खुर्ची मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.
- धाराशिव जिल्हा परिषदेत एकूण ५५ जागा आहेत. सत्तेचं समीकरण जुळवण्यासाठी २८ या ‘मॅजिक फिगर’ची गरज आहे.

- निवडणुकीच्या निकालानंतर भाजप १९ सदस्यांसह सर्वा त मोठा पक्ष ठरला आहे. तर शिंदे सेनेकडे १५ आणि अ जित पवारांच्या राष्ट्रवादीकडे ६ सदस्य आहेत.
- महायुतीचे हे तिन्ही घटक एकत्र राहिले तर सत्तास्थापनेत कोणतीही अडचण नाही. पण राजकारण आहे, इथे कधी ही काहीही होऊ शकतं…! हे ओळखूनच भाजपनं आपला ‘प्लॅन बी’ तयार ठेवला आहे.
- जर शिंदे सेनेतील एका गटानं भाजपला वगळून सत्ता स्था पनेचा प्रयत्न केला, तर तो त्यांच्यावरच उलटण्याची शक्य ता आहे.
- भाजप स्वतःच्या १९ सदस्यांसह,१ पुरस्कृत अपक्ष, १ बंड खोर आणि राष्ट्रवादीच्या ७ सदस्यांना सोबत घेऊन २८ चा आकडा गाठू शकतो.
- विशेष म्हणजे, खबरदारीचा उपाय म्हणून भाजपच्या बहु तांश सदस्यांसोबत शिंदे सेनेचेही काही सदस्य ‘सहलीवर’ रवाना झाले आहेत.
- सोमवारी रात्री उशिरा हे सर्व सदस्य सुरक्षित स्थळी पोहो चले असून, फोडाफोडी टाळण्यासाठी भाजपनं ही फिल्डिं ग लावली आहे.
- दुसरीकडे, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोध कांकडूनही हालचाली सुरू आहेत.
- यासाठी शिंदे सेनेनं पुढाकार घेतल्यास उद्धव सेना,काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची मदत घेऊन २८ चा आकडा गा ठण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
- मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपला रोख णं विरोधकांसाठी ‘कठीण’ असल्याचं दिसतंय.थोडक्यात सांगायचं तर, धाराशिव जिल्हा परिषदेत आता भाजपचा ‘टांगा पलटी’ करणं सोपं राहिलेलं नाही.
- आता अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोणाची वर्णी लागते, याक डे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











