
‘चल गं सखे नमनाला’ गीताने घातला धुमाकूळ २० दिवसात २ लाखांपेक्षा जास्त नमन प्रेमींची पसंती.
- प्रतिनिधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील नार डुवे गावातील गरीब कुटुंबात जन्मलेले विष्णू मुदगल यां च्या सुमधुर आवाजातील आणि वीर गावचे सुपुत्र कवी,शा हीर भिकाजी भुवड यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार लेले ‘चल गं सखे नमनाला’ या नमन गीताला नमन प्रेमी व सोशल मीडियावर फक्त २० दिवसांत २ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूव्स आणि लोकांनी पसंती दर्शवली आहे.
- शाहीर भिकाजी भुवड आणि गायक विष्णू मुदगल यांच्या वर कोकणातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विष्णू मुदग ल यांचे वय वर्ष ३ असतानाच पितृछत्र हरपले आणि कुटुं बाची जबाबदारी आईवर येऊन पडली.

- नशीब बलवत्तर म्हणून पुढे सर्व निभावले ‘चल गं सखे न मनाला’ हे गाण्याने सध्या रसिक मनांचा ठाव घेतला आहे.
- नमन कलेचा हंगाम सुरू असताना ही गाणे युट्यूबवर वाजत आहे गेल्या २० दिवसांत सुमारे २ लाख लोकांनी हे गीत पाहिले.
- याआधीचे गाणे वस्ताद कृष्णा जोगळे बुवा यांच्या लेखणी तून उतरलेले ‘नमन कला ही भारी’ या गाण्याने गायकांना नमन कलेची ओढ लावली आणि आता अनेक गायक नमन कलेवर गाणे गाऊ लागलेत.
- त्यातच शाहीर भिकाजी भुवड यांच्या लेखणीतून साकार झालेले नवीन वर्षातील नवीन सुंदर गाणे म्हणजेच ‘चल गं सखे नमनाला’ या गीताला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याशिवाय नमनप्रेमी आणि विविध कला क्षेत्रातून कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











