वक्फ बोर्डाच्या माध्यमातून मुस्लीम समाजाचा विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी.

  • प्रतिनिधी : मुजंम्मील पटेल :-आज करमाळा शहरात स कल मुस्लीम समाज यांच्या कडुन मुस्लीम समाजातील म स्जिद,मदरसा, व वक्फ च्या इतर मालमत्ता संदर्भात अडी अडचणी सोडविण्यासाठी भव्य अशा मेळाव्याचे आयोज न सकल मुस्लीम समाज करमाळा चे मार्गदर्शक तालुका अध्यक्ष हाजी कलीम काझी सर यांनी आयोजित केला होता.
  • यावेळी महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी उप स्थित होते.
  • तसेच महाराष्ट्र राज्य काझी सेवा संघाचे अध्यक्ष शफीक भाई काझी, महाराष्ट्र राज्य चे जमियत उलमा ए हिंद उपा ध्यक्ष हाफीज सिद्दीकी, सुलेमानिया मस्जिद चे मौलाना फारुख रझा,आयशा मस्जिद चे मुप्ती अबु रेहान, मौलाना सय्यद अली, इत्यादी मंचावर उपस्थित होते.
  • यावेळी बोलताना सकल मुस्लीम समाज करमाळा चे मार्ग दर्शक हाजी कलीम काझी सर यांनी सांगितले की वक्फ बोर्डाच्या माध्यमातून मस्जिद,मदरसा, आणि इतर मालम त्तांच्या संदर्भात त्या जागेवर वक्फ बोर्डाकडून बेरोजगार युवकांसाठी उद्योगधंद्यांकरिता गाळे बांधुन द्यावे.
  • अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी उत्तम प्रकारचे तीन किंवा चार तालुके मिळून शैक्षणिक संकुल उभारण्या त यावे, मुस्लीम समाजातील आणि हिंदू समाजातील गरी ब कुटुंबातील लोकांकरिता वक्फ बोर्डाच्या जागेवर उत्तम अशा दर्जाचे आरोग्य सुविधा देण्यासाठी हाॅस्पिटल ची उभारणी करण्यात यावी.
  • मुस्लीम समाजातील बेरोजगार युवकांसाठी व शिक्षण घे णाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद आर्थिक महामंड ळच्या माध्यमातून शुन्य टक्के दराने कर्ज देण्यात यावे अशा विविध प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
  • वक्फ बोर्डाने आता आपल्या जागेवर व्यवसायिक पद्धती चा अवलंब करून वक्फ बोर्डाची आर्थिक स्थिती मजबूत करुन समाजाच्या उपेक्षित वर्गाच्या उन्नती करिता काम करावे अशी अपेक्षा केली आहे.
  • यावेळी मुफ्ती अबु रेहान यांनी मस्जिद आणि मदरसा संद र्भात वक्फ बोर्डाच्या ऑफीस मध्ये नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी मांडल्या व त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा.
  • तसेच महाराष्ट्रातील तमाम मस्जिद आणि मदरसा मधील शिक्षक मौलाना यांना दरमहा 10,000 रुपये अनुदान म्ह णून मानधन देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
  • वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी साहेब यांनी सत्कारा ला उत्तर देताना सांगितले की मी वक्फ बोर्डाचा अध्यक्ष झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील मस्जिद, मदरसा आणि वक्फ च्या नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर केल्या.
  • महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून किंवा तालुक्यातुन नोंदणी करिता किंवा वक्फ च्या इतर कामांसाठी मुख्य कार्यालय संभाजी नगर येथे न येता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आता वक्फ कार्यालय सुरू केले आहे.
  • वर्षानुवर्षे जे प्रकरणे ट्रिब्युनल कोर्टात प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज केली आहे.
  • त्यांनी सांगितले की सकल मुस्लिम समाजाचे मार्गदर्शक हाजी कलीम काझी सर यांनी मुस्लीम समाजातील अडच णी संदर्भात ज्या काही सुचना केल्या आहेत.
  • त्यावर विचार करून मुस्लीम समाजाला फायदा कसा हो ईल व आर्थिक प्रगती आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसा ठी सकारात्मक असा निर्णय घेऊन वक्फ बोर्डाच्या मालम त्तांच्या व्यावसायिक पद्धतीने विकास करण्यात येईल.
  • करमाळा समाजातील सर्व मुस्लीम बांधवांनी हाजी कली म काझी सर व त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सहकार्या बरोबर खंबीर पणे उभा राहुन समाजातील प्रगती करिता काझी सरांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली उत्तमोत्त म प्रगती करावी त्यांच्या सर्व प्रकारची मदत करण्याची आमची तयारी आहे असे प्रतिपादन केले आहे.
  • यावेळी मौलाना सिकंदर, मौलाना अन्वर, मौलाना रफीक, नायब तहसीलदार हाजी सादिक काझी, अॅड अलिम प ठाण, ॲड नईम काझी, रहनुमा ट्रस्ट चे सचिव सुरज शेख डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन चे सचिव रमजान बेग, रोप फाऊंडेशन चे अध्यक्ष मुस्तकीम पठाण, रहनुमा ट्रस्ट चे उपाध्यक्ष आझाद शेख, मास्टरमाईंड फिरोज बेग, खजिनदार इम्तियाज पठाण, इकबाल शेख, अयुब शेख, अरबाज बेग, अलिम पठाण, शाहीद बेग, अक्रम मदारी, अयुब मदारी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रहनुमा चॅ रिटेबल ट्रस्ट आणि भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा यांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles