कोकण रहिवासी मंडळ, कोकण आयोजित कोकण चषक २०२६ पर्व २ यशस्वीरित्या संपन्न.

  • प्रतिनिधी : कळवा : प्रमोद तरळ :- कोकण रहिवासी मंडळ, कोकण ( सिंधुदुर्ग,रायगड आणि रत्नागिरी) यांच्या वतीने आयोजित ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा – कोकण चषक २०२६, पर्व २ रे मोठ्या उत्साहात व खेळा डूंच्या दमदार सहभागासह यशस्वीरित्या पार पडली.
  • दि. १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या या स्पर्धेला क्रीडारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे थेट प्र क्षेपण YouTube वर करण्यात आले होते.
  • स्पर्धेचे उद्घाटन समाजसेवक श्री. सुशांत दादा सूर्यराव यां च्या हस्ते पार पडले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.संतोष सायकर, उपाध्यक्ष श्री.यशवंत तावडे, सचिव कु.हर्षद पा लव, खजिनदार श्री.रामदास यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
  • अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत खांबे इले व्हन संघाने विजेतेपद पटकावले रोख ₹ 20,000 व आ कर्षक चषक तर नाणार पॅकर्स संघाने उपविजेतेपद मिळविले.
  • रोख रक्कम– ₹10,000 व आकर्षक चषक. तृतीय पारि तोषिक – साई स्टार भांडुप संघाने पटकावले रोख रक्कम ₹5,000 व आकर्षक चषक प्रदान करण्यात आला.
  • या स्पर्धेस नगरसेवक श्री.संतोष शेठ तोडकर,नगरसेविका कु.प्रियांका ताई अविनाश पाटील,नगरसेविका सौ. आरती गायकवाड, प्रभाग अध्यक्ष श्री.पद्माकर पाटील (SP) तसे च समाजसेवक श्री.राजेश पाटील, श्री.विकास बडदरे,श्री. विजय कदम, श्री.अशोक जाधव, श्री.संदेश भोसले, श्री. नितीन वाडेकर आदी मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले.
  • कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री.संतोष सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष श्री. यशवंत तावडे, सचिव कु.हर्षद पालव, उपसचिव श्री.रविं द्र साटम, खजिनदार श्री. रामदास यादव, उपखजिनदार श्री.लवेश उतेकर, संपर्कप्रमुख कु. प्रथमेश सुर्वे, कु.रोशन शिंदे तसेच सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
  • या स्पर्धेमुळे कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागि री जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना एक व्यासपीठ उपलब्ध झाले असून कोकणवासीयांमध्ये एकात्मता व बंधुभाव वृद्धिंगत झाला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles