माझी वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल जाहीर…! आदर्श गाव विरसई पुन्हा कोकण विभागात प्रथम.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- गतवर्षी महाराष्ट्र शासन पुर स्कृत माझी वसुंधरा अभियान 4.0 चा निकाल जाहीर झा ला तेव्हा संपूर्ण कोकण विभागातील (रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर) पाच जिल्ह्यांमधून दापोली तालु क्यातील आदर्श गाव ग्रामपंचायत विरसईने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा (₹५० लाख) पुरस्कार मिळवला होता.
  • आज पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे…! माझी वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल जाहीर झाला असून ग्रामपंचायत विरसईने पुन्हा कोकण विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
  • या यशामध्ये सरपंच मनोरमा राणे, उपसरपंच विद्यार्थी जा धव, ग्रामविकास अधिकारी विरेश कदम, मार्गदर्शक दिने श राणे, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारीवर्ग यांचे मोलाचे योगदान आहे.
  • तसेच विरसई जनसेवा मंडळ (मुंबई/ग्रामीण) चे सर्व पदा धिकारी, विरसई जनसेवा महिला मंडळ चे पदाधिकारी, विरेश्वर विद्यालय विरसई येथील विद्यार्थी-शिक्षक व कर्म चारीवर्ग, जि.प.आदर्श मराठी शाळेतील विद्यार्थी-शिक्षक, अंगणवाडी सेविका- मदतनीस तसेच आदर्श गाव विरसई तील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व ग्रामस्थांचे हे एकत्रित यश आहे.
  • पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या दि शेने विरसई गावाने उभा केलेला आदर्श संपूर्ण कोकणा साठी प्रेरणादायी आहे.अशी माहीती विरसई जनसेवा मंड ळ रजि.मुंबई चे सचिव सुरेश बेटकर यांनी दिली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles