
तीर्थक्षेत्र असगणी गावातील ५००० वर्षापूर्वीच्या पांडवकालीन श्री स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव संपन्न.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- खेड तालुक्यातील असगणी गावातील ५००० वर्षापूर्वीच्या पांडवकालीन श्री स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या आनंदात आणि भक्तीमय वातावरणात साजरा झाला.
- निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे. मंदिरच्या चारही बाजू ला बारा महिने पाणी असते.मंदिरच्या बाजूला तलाव आहेत.
- लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन पांडवकालीन मंदिर हीच असगणी गावची ओळख आहे.

- २०१७ मध्ये असगणी गावचे सुपुत्र संदीप फडकले यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. यंदाची १० वी महाशिवरात्री आहे.या महाशिवरात्री उत्सवाला सकाळी ६ वाजल्या पा सून रात्री १० वाजेपर्यंत भाविक भक्त दर्शनासाठी येत होते.
- तसेच आय लव असगणी जय भोलेनाथ सेल्फी पॉइंट चे उद्घाटन एम.ए.सी.बी चे अधिकारी श्री.विजेंद्र मानकर सा हेब हस्ते करण्यात आले.
- तसेच महाशिवरात्री उत्सवाला अनेक मान्यवर,ग्रामस्थ तसेच खेड तालुक्यातील असंख्य भाविक उपस्थित होते.
- श्री.दीपक माने (सरपंच लवेल),श्री.कृष्णा शेलार, श्री.वसं त मोरे(जल फाऊंडेशन सल्लागार),श्री.चंद्रकांत मोरे(जल फाऊंडेशन सदस्य),श्री.प्रकाश गोठल (चिंचवली) यांनी महाशिवरात्री उत्सवाला उपस्थिती दाखवली.
- मंदिर व्यवस्थापक संदीप फडकले,दादा वैद्य तसेच त्यांचे सहकारी अजय शिगवण,राजेंद्र धाडवे, अरुण फडकले, प्रभाकर नायनाक,राकेश पवार, रुपेश गोसावी, अनंत स. नायनाक,प्रमोद पवार, सचिन बाईत, किरण शिगवण,सुनी ल तुकाराम धाडवे, अशोक शिगवण, प्रदीप शिगवण, मंगे श विटले,सुजल फडकले आणि गावातील तरुण वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











