परंडा येथे लिपिक कर्मचाऱ्यांचे चौथ्या ही ‘काम बंद’ आंदोलन; चालू प्रशासकीय कामकाज ठप्प.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- महाराष्ट्र राज्य सरकारी लि पिक संवर्गीय हक्क समितीच्या वतीने पुकारण्यात आले ल्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत, परंडा येथी ल विविध शासकीय कार्यालयांतील लिपिकांनी आजपासू न ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे.
  • ग्रेड पे मध्ये सुधारणा करणे आणि इतर प्रलंबित मागण्यां च्या पूर्ततेसाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, यामुळे तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि इतर विभागां तील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
  • प्रमुख मागण्या:
  • आंदोलक कर्मचाऱ्यांच्या मते, गेल्या अनेक वर्षांपासून लि पिक संवर्गाच्या वेतनश्रेणीत असलेल्या त्रुटी दूर करण्यात आलेल्या नाहीत.
  • प्रामुख्याने १९०० ग्रेड पे ऐवजी २४०० ग्रेड पे लागू करा वा, ही लिपिकांची जुनी मागणी आहे.
  • याशिवाय पदोन्नतीतील अडथळे आणि इतर भत्त्यांबाबत ही शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी त्यांची माग णी आहे.
  • कामकाजावर परिणाम:
  • सकाळपासूनच लिपिक कर्मचाऱ्यांनी कार्यालयाबाहेर ज मा होऊन घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे दाखले मिळवणे, शासकीय योजनांचे अर्ज भरणे आणि इतर दैनं दिन प्रशासकीय कामे रखडली आहेत.
  • दूरवरून आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती परतावे ला गत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
  • पुढील पवित्रा:
  • “जोपर्यंत शासन आमच्या न्याय्य मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” असा इशारा परंडा तालुका लिपिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
  • शासनाने तातडीने हस्तक्षेप करून मार्ग न काढल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
  • या आदोलनांत श्री.प्रफुल्ल गोडगे, आप्पा महानवर,बळीरा म घोडके, सुबोध देशमुख, अभय कुलकर्णी, विशाल बार स्कर, कदम, अकबर तांबोळी, उमेश हींगे, श्रीम.सुषमा मा ने,विजया कुंभार, सुवर्णा वाघमारे, बागूल, संजिवनी नटवे, राणी ननवरे ईत्यादी आंदोलणात सहभागी होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles