
रायपाटण येथील जिजामाता विद्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती आगळ्या स्वरूपात साजरी.
- प्रतिनिधी : पाचल : प्रमोद तरळ :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात, जगाच्या काना कोपऱ्यामध्ये साजरी केली जात आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठि कठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहे.
- शाळांमधून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी केली गेली.
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती विद्यार्थ्यां नी मनोगते पोवाडे सादर करून महाराजांची जयंती साज री केली गेली.

- परंतु जिजामाता विद्यामंदिर रायपाटणच्या विद्यार्थ्यांनी छ त्रपती शिवाजी महाराजांना एक आगळा वेगळा उपक्रम राबवून छ.शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
- जिजामाता विद्या मंदिरा रायपाटणच्या शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अभ्यासिकेचे आयोजन करून एक वेगळ्या प द्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन कर ण्याचा प्रयत्न केलेला आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती शाळा महाविद्यालय सर कारी कार्यालय यामध्ये एक पारंपारिक पद्धतीने जयंती साजरी केली जाते.
- परंतु जिजामाता विद्या मंदिर रायपाटणच्या विद्यार्थ्यांनी द हावीची परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे आणि आज सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे फक्त सका ळी शाळेमध्ये विद्यार्थी जयंती साजरी करतात व घरी जातात.
- परंतु या शाळेने मात्र सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वा जेपर्यंत अभ्यास करून शिवाजी महाराजांना अभिवादन केले ही अभ्यासिका विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सुनील कुंभार सर श्री गौतम पांगरीकर सर यांच्या मार्गदर्शनाखा ली आयोजित करण्यात आली होती.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











