परंडा बसस्थानकात स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरण केंद्राचे आगार प्रमुख बालाजी मुळेसाहेब यांच्या हस्ते लोकार्पण.

  • प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आ ता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे.
  • रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
  • यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे, अशी माहिती परंडा आगार प्रमुख श्री बालाजी मुळेसाहेब यांनी दिली.
  • केवळ तांत्रिक सुधारणा नसून, प्रवाशांच्या विश्वासाला डि जिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत.
  • या प्रकल्पासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असू न, लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे.
  • कोणाला मिळणार NCMC कार्ड….?
  • या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे:
  • विद्यार्थी: शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल.
  • ज्येष्ठ नागरिक व महिला: अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधा रण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल.
  • दिव्यांग प्रवासी: UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा अ सलेले कार्ड.
  •  पुरस्कारार्थी व पत्रकार:  स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृती धारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना वि भागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारा मार्फत वितरण.
  • कार्डची वैशिष्ट्ये – प्रवासात स्मार्ट सोय
  • १) किंमत: नवीन कार्ड १९९ रुपये (GST सह). जुने स्मा र्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत उपलब्ध.
  • २) वॉलेट मर्यादा: किमान १०० रुपये; ५० रुपयांच्या पटी त रिचार्ज.
  • ३) रिचार्ज सुविधा: ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेत स्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज.
  • ४)नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा: ज्येष्ठ नागरिक आणि महि लांच्या सोयीसाठी ३००० हून अधिक अधिकृत एजंट नियु क्त करण्यात आले आहेत.
  • ५) बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार अस ल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
  • एस.टी.चा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हातात आणि सुट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहासजमा होत आहेत.
  • नव्या युगात, एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे.
  • यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किरण शहा, सहाय्यक वाहतूक निरीक्षक गोरख खराटेसाहेब, प्रभारक संजय कां बळे, वाहतूक नियंत्रक श्री संजय कदम व श्री.बालाजी अ लबत्ते, उमेश पालखे, केंद्र प्रमुख श्री लांडगे साहेब हे उप स्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles