
परंडा महावितरणचा ‘शॉक’दायक कारभार; वीज बिलावर रीडिंग नाही, तरीही वसुलीचा तगादा…!
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-परंडा येथील महावि तरणचा भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य ग्राहकां ना बसत असून, वीज बिलांमध्ये मीटर रीडिंग उपलब्ध न सतानाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सक्तीची वसु ली केली जात आहे.
- विशेष म्हणजे, सध्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत आणि पवित्र रमजान महिनाही सुरू आहे, अ शा काळात वीजपुरवठा खंडित करून महावितरण कडून जनतेला वेठीस धरले जात असल्याचा आरोप नागरिकां नी केला आहे.

- काय आहे नेमका प्रकार…..?
- अनेक ग्राहकांच्या वीज बिलावर मीटर रीडिंगचे फोटो किं वा अचूक आकडेवारी उपलब्ध नाही.
- असे असतानाही अव्वाच्या सव्वा बिल देऊन महावितरण चे कर्मचारी थकीत वसुलीसाठी ग्राहकांच्या घरी तगादा लावत आहेत.
- बिलातील त्रुटींकडे तक्रार करूनही अधिकारी याकडे जा णीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
- नियमानुसार, अचूक रीडिंग नसेल तर बिल दुरुस्त करून देणे अपेक्षित असताना, थेट वीजपुरवठा खंडित करण्या ची कारवाई केली जात आहे.
- नियमांनुसार मीटर रीडिंग न घेता अंदाजे बिले देणे चुकीचे आहे, तरीही येथे हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.
- विद्यार्थी आणि रोजेदार( उपवास ) संकटात:
- सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. रात्रीच्या वेळी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना वी ज नसल्यामुळे मोठा अडथळा निर्माण होत आहे.
- दुसरीकडे, रमजान महिना सुरू असल्याने मुस्लिम बांधवां ना सहरी आणि इफ्तारच्या वेळी विजेची अत्यंत गरज असते.
- अशा संवेदनशील काळातही कोणताही मानवतावादी दृ ष्टिकोन न ठेवता महावितरणकडून वीज खंडित केली जा त असल्याने संताप व्यक्त होत आहे.
- महावितरणच्या या मनमानी कारभाराविरुद्ध परंडा तालु क्यातील ग्राहक आक्रमक झाले आहेत.
- जोपर्यंत वीज बिलातील त्रुटी दूर होत नाहीत आणि अचू क रीडिंग मिळत नाही, तोपर्यंत सक्तीची वसुली थांबवावी, अशी मागणी वीजाग्राह का कडून केली जात आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











