
परंडा येथील ५ वर्षीय जैद विजापूरेने कडक उन्हात पूर्ण केला रमझानचा रोजा; शहरातून होत आहे कौतुकाचा वर्षाव.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- परंडा येथीत जैद नासीर वि जापूरे याणी रमझान चा रोजा केला आहे. सध्या कडक उन्हाचा तडाखा जाणवत असतानाच, मुस्लिम बांधवांचा पवित्र रमझान महिना सुरू आहे.
- अशा परिस्थितीत मोठ्या माणसांनाही उपवास करणे क ठीण जात असताना, परंडा शहरातील अवघ्या पाच वर्षे वयाच्या जयद नासीर विजापूरे या चिमुकल्याने कडक उ न्हात आपला रोजा पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

- जयदने पहाटेची ‘सेहरी’ करून दिवसभर अन्न-पाण्याविना राहून आपला उपवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. एवढ्या लहान वयात त्याने दाखवलेली ही धार्मिक चिकाटी आणि जिद्द पाहून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- सायंकाळी ‘इफ्तार’च्या वेळी जयदचे कुटुंबीय आणि व्या पारी व परिसरातील नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले.
- सध्याच्या तापत्या उन्हात चिमुकल्या जयदने दिलेली ही ‘रोजाची’ परीक्षा परंडा शहरात चर्चेचा विषय ठरली असू न, त्याच्या या जिद्दीचे सोशल मीडियावरही फोटो व्हायरल होत आहेत. परंडा शहरातून जयद यांचे कौतूक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











