लाखोंचा खर्च धूळखात…! परंडा तहसील कार्यालयातील सार्वजनिक शौचालय शोभेची वस्तू; प्रशासकीय टोलवाटोलवी सुरू.

  • प्रतिनिधी : फारुख शेख :-परंडा तहसील कार्यालय परि सरामध्ये शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेले सार्व जनिक शौचालय सध्या पूर्णपणे वापराविना पडून असून त्याची मोठी दुरवस्था झाली आहे.
  • शासकीय निधीचा असा अपव्यय होत असताना, संबंधित विभागाचे अधिकारी मात्र एकमेकांकडे बोट दाखवून आ पली जबाबदारी झटकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
  • तहसील कार्यालयात दररोज शेकडो नागरिक विविध का मांनिमित्त येत असतात. त्यांची सोय व्हावी या उद्देशाने प्रशासनाने या ठिकाणी सुसज्ज शौचालयाची उभारणी केली.
  • मात्र, आज हे शौचालय ‘धूळखात’ पडले असून नागरिकां ना उघड्यावर जावे लागत आहे किंवा मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
  • अधिकारी देतायत ‘उडवाउडवीची’ उत्तरे
  • या गंभीर विषयावर जेव्हा उपविभाग, सार्वजनिक बांधका म विभाग(PWD), परंडा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर देण्याऐवजी उडवाउड वीची उत्तरे देण्यात आली.
  • दुसरीकडे, तहसील कार्यालयाकडे विचारणा केली असता, “आम्हाला याबाबत काहीही माहिती नाही, तुम्ही सार्वजनि क बांधकाम विभागाकडे चौकशी करा,” असे सांगून हात वर करण्यात आले.
  • जनतेचा सवाल: जबाबदार कोण?
  • एकीकडे सरकार ‘स्वच्छ भारत अभियाना’वर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे तहसील कार्यालया सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी बांधलेली वास्तू प्रशासकीय अनास्थेमुळे काम पूर्ण झालेले नाही.
  • जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशांचा अपमान अस ल्याची भावना नागरिकांमध्ये उमटत आहे.
  • आता या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जाणा र का….? की हे शौचालय असेच शेवटची घटका मोजत राहणार..? असा संतप्त सवाल परंडा तालुक्यातील जनता विचारत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles