श्री.क्षेत्र टेरव येथे ३ मार्चपासून जल्लोषात साजरा होणार शिमगोत्सव.

  • प्रतिनिधी : चिपळूण : प्रमोद तरळ :-निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरवच्या कुलस्वामिनी श्री भवानी – वाघजाई या सुप्रसिद्ध व जागृत देवस्थानचा शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात व धा र्मिक वातावरणात ३ मार्चपासून साजरा होणार आहे.
  • देवस्थानचे मानकरी,पुजारी व ग्रामस्थ हे उत्सवाची जय्यत तयारी करत आहेत.
  • कुलस्वामिनी श्री भवानी- वाघजाई मंदिरासमोर ग्रामस्थां नी आणलेली लाकडे, कवळ व गवत इत्यादीने सजविले ल्या होमाची पुजारी पारंपारिक पद्धतीने गावच्या मानक ऱ्यांच्या हस्ते पहाटे यथासांग विधीवत पुजा करुन घेतील.
  • गावचे पुजारी (गुरव) चांदीने मढविलेली पालखी सजवून कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी या देवतांच्या रुपी लावून मंदिर व होमा समोरील मानाच्या सहाणेवर आसनस्थ करतील.
  • खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे वेध लागण्यापूर्वी ढोलताशां चा गजरात होमाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झा ल्यानंतर होम पहाटे ५.३० वाजता प्रज्वलीत करुन ग्राम स्थ होळीत अग्निदेवतेस श्रीफळ अर्पण करतील.
  • प्रदक्षिणा घालताना भैरी- केदाराच्या चांगभलं असे म्हणत पालखी नाचवत उंचावून उपस्थित भाविकांना दर्शन दिले जाईल, तो क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा असेल.
  • नववधू,सुवासिनी सहाणेवर पालखीत देवीच्या ओट्या भर तील. ग्रहण असल्यामुळे पालखी मंदिरात सकाळी ६.२० वाजता स्थानापन्न करून मंदिर दर्शनासाठी संध्याकाळी ६.४५ पर्यंत बंद ठेवण्यात येईल.
  • ग्रहण काळ संपल्यावर मंदिराची साफसफाई, शुद्धीकरण व देवतांचे अभिषेक करून रात्री ८ नंतर परंपरेप्रमाणे पा लखी लिंगेश्वर वाडीतील स्वयंभू पुरातन जागृत शंकर मं दिर येथील मानाच्या सहाणेवर नेण्यात येईल.
  • लिंगेश्वर वाडीतून पालखीचा छबिना काढून निम्मेगाव, गुर ववाडी, कुंभारवाडी, राधाकृष्णवाडी, भारतीवाडी आणि तळेवाडी अशी वाजत-गाजत मध्यरात्री मंदिरात आणली जाईल.
  • यावेळी वाडी-वाडीतील ग्रामस्थ आकर्षक विद्युत रोषणाई सह रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी करतील व गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात पालखीचे जल्लो षात स्वागत करून, सुवासिनी ठिकठिकाणी ओट्या भरतील.
  • दि. ४ ते १४ मार्च या कालावधीत पालखी रूढीपरंपरेनुसा र घरोघरी नेण्यात येईल यास ‘भोवनी’ असे संबोधले जाते.
  • सदर शिमगोत्सवास बहुसंख्य चाकरमानी कुटुंबियांसह आवर्जुन उपस्थित राहतील.
  • पालखी कुठेही वास्तव्यास न राहता ती मिरवणुकीने वाज त-गाजत वाडी-वाडीतील घरे झाल्यावर रात्री मंदिरात आ सनस्थ होईल.
  • रात्रौ ग्रामस्थ वाडीतील पाळ्यांप्रमाणे मंदिरात पहाऱ्या साठी (सेवेसाठी) उपस्थित राहतील.
  • सदर कालावधीत मंदिर सकाळी ७ ते रात्रौ १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहील. पालखी सोबत अब्दागिरी व भग वे निशाण नाचवत ढोल वाजविले जातील.
  • परंपरेनुसार गावातील मुस्लिम बांधव पालखीसोबत ताशा वाजावतील, अशा या सांस्कृतिक, सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शिमगोत्सवाची सांगता रुपी भंडारुन करण्यात येईल.
  • या उत्सवात सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होतील.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles