
परंडा येथे महावितरणचा विजेचा खांब टेंपोवर कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाली.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा येथील प्रीतम मंगल कार्यालयासमोर उभा असलेल्या एका टेंपूवर MH 45 AF 5121 हा नंबर चा टेंपू आहे. महावितरणचा विजे चा पोल कोसळल्याने भीषण अपघात झाला.
- या घटनेत टेंपूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतम मंगल कार्यालयासमोर एक मालवाहू टेंपू उभा होता.
- यावेळी अचानक महावितरणचा विद्युत खांब या वाहनावर कोसळला. खांब पडल्याने टेंपूच्या केबिनचा आणि वरील भागाचा चक्काचूर झाला आहे.

- ही घटना घडली तेव्हा वाहनात किंवा जवळ कोणीही नस ल्याने मोठा अनर्थ टळला.

- महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह:
- हा पोल जुना किंवा खिळखिळा झाला होता का, याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे परि सरात काही काळ खळबळ उडाली होती.

- महावितरणच्या अशा प्रकारच्या दुर्लक्षामुळे भविष्यात मो ठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त करत नागरिकां नी संताप व्यक्त केला आहे.

- बाधित वाहनधारकाने नुकसान भरपाई मिळण्याची माग णी केली असून, महावितरण यावर काय भूमिका घेते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











