मराठी दिनानिमित्त मॉडर्न हायस्कूल, निगडी येथे ‘मराठी साहित्य मंडळा’ची स्थापना व ग्रंथदिंडी सोहळा उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- मॉडर्न हायस्कूल,इंग्रजी माध्यम निगडी येथे आधुनिक मराठी साहित्याचे ज्येष्ठ क वी व विचारवंत विष्णु वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यां चा जन्मदिन उत्साहात संपन्न झाला.
  • कुसुमाग्रज हे कवी, नाटककार व समीक्षक म्हणून प्रसिद्ध असून त्यांच्या साहित्यामध्ये स्वातंत्र्य, माणुसकी, समता व सामाजिक जाणीव यांचा ठळक आविष्कार आढळतो.
  • म्हणूनच मराठी दिनानिमित्त मराठी भाषेचा गौरव करणा ऱ्या ‘मराठी साहित्य मंडळा’ची स्थापना व मराठी दिन ग्रंथ दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
  • मराठी साहित्य मंडळाचे उद्घाटन प्रशालेच्या मुख्याध्यापि का सौ. गौरी सावंत यांच्या शुभहस्ते, शाळेतील शिक्षकवृं दाच्या उपस्थितीत करण्यात आले.
  • कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ग्रंथदिंडीने झाली. विविध मराठी ग्रंथ, थोर साहित्यिकांचे विचारफल क, घोषवाक्ये व वाचनसंस्कृतीचा संदेश देणाऱ्या तसेच म राठी भाषेचे विविध शैक्षणिक साहित्य मांडणीमुळे संपूर्ण शाळा परिसरात मराठी भाषेचा उत्सव साजरा झाला.
  • विद्यार्थ्यांच्या सहभागाने कार्यक्रमात विशेष चैतन्य निर्माण झाले.
  • उद्घाटनप्रसंगी बोलताना गौरी सावंत यांनी मराठी ही आप ली मातृभाषा असून तिचे जतन, संवर्धन आणि वाचनसं स्कृती वाढवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
  • इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत असतानाही मराठी भाषेशी नाते घट्ट ठेवण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
  • नवस्थापित मराठी साहित्य मंडळाच्या माध्यमातून कवि ता वाचन, कथाकथन,नाट्यवाचन, वक्तृत्व व साहित्य चर्चा असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावे ळी देण्यात आली.
  • प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजा नन एकबोटे, सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, सेक्रेट री प्रा.डॉ.शामकांत देशमुख, शाळा समितीचे अध्यक्ष दीप क मराठे, व्हिजिटर प्रा.डॉ.अतुल फाटक यांनी मराठी दि नानिमित्त शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles