
ना घरात शैक्षणिक वारसा, ना पाहिले विद्यापीठ, संघर्ष मात्र एम ए च्या अभ्यासक्रमात.
- प्रतिनिधी : इंदापूर : प्रमोद तरळ :- तानाजी बबन धरणे कवी/लेखक, ग्रामपंचायत अधिकारी सध्या कार्यरत जि.प .रायगड आनोसेवाडी- ग्रामपंचायत कळवंतवाडी, आंबळे यांच्या संघर्षमय हृदस्पर्शी हेलपाटा कादंबरीचा सन २०२५/२६ या शैक्षणिक वर्षात उस्मानिया युनिर्व्हरसिटी हैद्राबादच्या पदव्युतर एम ए मराठीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

- घरात अठरा विश्व दारिद्र्य मात्र उच्च शिक्षण घेऊ न शक लेल्या तानाजी धरणे यांनी “हेलपाटा” कादंबरीच्या माध्य मातून मांडलेला आपला जीवन संघर्ष विद्यापीठा पर्यंत पोहोचला आहे.
- या कादंबरीला २१ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळाले असुन तिची सातवी आवृतीसह हिंदी व इंग्रजी आवृती प्रकाशित झाली आहे.
- तसेच तिची लवकरच गुजराती भाषेतील आवृती प्रकाशि त होत आहे.
- हेलपाटा कादंबरी या पुर्वी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तसेत छञपती संभाजीनगर येथिल भार तरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे phd संशोधन अभ्यासासाठी निवड झाली आहे.
- तानाजी धरणे यांचे यापुर्वी सहा कवितासंग्रह प्रकाशित अ सुन त्यात “शेताच्या बांधावर, सांजवेळ, स्वप्नचिञ , चांदणं पेरित जाऊ, होरपळ, नांगरतो तळहाताच्या रेषा” या काव्य संग्रहांचा समावेश आहे.
- तसेच त्यांची आगामी “पायपीट” ही कादंबरी व “मुलाफुलां ची बाग” हा बालकवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावरती आहे.
- तसेच त्यांची २२ श्रवणीय गीतं वेगवेगळ्या यु ट्युब चॅनेल वरती प्रसारीत झालेली आहेत. त्यांच्या कविता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळ ‘ बाल भारती ‘ किशोर मासिकातही प्रकाशित झालेल्या आहेत.
- या कार्याबद्दल त्यांना अनेक साहित्य क्षेञातील योगदाना बद्दल पुरस्कार मिळाले आहेत . त्यांचे गुरुजन, अधिकारी वर्गातुन तसेच चाहते व मित्रपरिवार यांजकडून कौतुक होत आहे.

- या बाबत तानाजी धरणे यांनी उस्मानिया विद्यापीठाच्या प्रा.डाॅ.नम्रता बागडे मॅडम मराठी विभागप्रमुख तसेच अ भ्यासमंडळाचे अध्यक्ष प्रा.अरुण कुलकर्णी सर व सर्व सं चालकमंडळ व तिन्ही विद्यापीठे त्यांची अभ्यासमंडळं अ ध्यक्ष कार्यकारी मंडळ तसेच विद्यापीठांचे कुलगुरु यांचे व चाहत्यांचे, वाचकांचे आभार मानले आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











