
परंडा येथील साडेतीन वर्षांच्या लूबना शेख ने पूर्ण केला रमझानचा पहिला रोजा.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- मुस्लीम धर्मी यांच्या पवित्र रमझान महिन्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असू न, परंडा शहरातील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीने कडक उन्हात आपला पहिला उपवास (रोजा) यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
- लूबना जावेद शेख असे या चिमुकलीचे नाव असून, तिच्या या जिद्दीचे संपूर्ण शहरात कौतुक होत आहे.

- पवित्र महिन्यात भक्तीचा अनोखा संदेश रमझान महिना हा अत्यंत संयम आणि उपासनेचा महिना मानला जातो.
- या काळात पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंबही न घेता रोजा पाळला जातो. अशा कठीण नियमांचे पालन साडेतीन वर्षांच्या लूबनाने मोठ्या उत्साहात केले.
- दिवसभर कडक ऊन असतानाही तिने आपला रोजा पूर्ण केला आणि संध्याकाळी इफ्तारच्या वेळी कुटुंबीयांसोबत लूबनाने रोजा सोडला.
- सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव जावेद शेख यांची कन्या असलेल्या लूबनाने इतक्या लहान वयात दाखवलेली धा र्मिक ओढ पाहून स्थानिक नागरिक आणि नातेवाईक थक्क झाले आहेत.
- “तिचा उत्साह पाहून आम्हालाही प्रेरणा मिळाली,” अशी भावना तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
- सोशल मीडियावरही या चिमुकल्या रोजेदार लूबनाचे फो टो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून लूबना या मूलेचे शहरातून व तालूकयातून कौतुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











