माहुली येथे मोफत आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : हिराजी देसले :- येथे इस्क्रा फाऊंडेशन, सुभवैशाली फाऊंडेशन आणि रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे य शस्वी आयोजन करण्यात आले.
  • शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, पर्यावरण संवर्धन आणि समाजविकास या क्षेत्रांत सातत्याने कार्यरत असले ल्या या तिन्ही संस्थांनी ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्या च्या उद्देशाने हा उपक्रम राबविला.
  • इस्क्रा फाऊंडेशनचे संस्थापक हरिश्चंद्र देसले व अध्यक्ष चे तन कांबळे, सुभवैशाली फाऊंडेशनचे संस्थापक मयूर ठो के व डायरेक्टर रेश्मा वायभट, तसेच रोहन नाईक चॅरिटेब ल ट्रस्ट संस्थापक कांता नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले.
  • याबाबतची माहिती इस्क्रा फाउंडेशन संस्थेच्या सचिव प्रगती कांबळे यांनी दिली.
  • नामदेव तुकाराम आगिवले पोलिस पाटील माहुली गाव आणि त्यांचे सुपुत्र प्रदीप नामदेव आगिवले सरपंच यांच्या तर्फे सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.
  • तसेच गणेश मधुकर वेखंडे(चांदरोटी) यांच्यातर्फे राहण्या ची व्यवस्था करण्यात आली.चिंटू खरपडे आणि वर्षा वा ळकोली यांच्या तर्फे दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्या त आली.
  • शिबिराच्या पूर्वतयारीसाठी कार्यकर्त्यांनी माहुली गावाती ल सुमारे ५०० घरांमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेटी घेत जनजागृ ती केली.
  • काटेकोई पाडा, सुतार पाडा, खरपडे पाडा, मेगल पाडा, जु नोने पाडा आणि चादरोली पाडा येथील ग्रामस्थांनी मो ठ्या प्रमाणावर शिबिराचा लाभ घेतला.
  • ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला.
  • शिबिरामध्ये बीपी तपासणी, रक्तातील साखर (शुगर) तपा सणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी तसेच दंत तपासणी (डेंटल चेकअप) करण्यात आली.
  • तपासणीनंतर रुग्णांच्या आजारानुसार आवश्यक औषधां चे मोफत वाटप करण्यात आले.
  • हा उपक्रम पुण्यातील PCMC वैद्यकीय अधिकारी डॉ. अ जित आणि डॉ अनिकेत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
  • तसेच सुभवैशाली फाउंडेशन मार्फत आदित्य इंगोले, आदे श गायकवाड, महेश काळे, हर्ष बिहानी,आदित्य जोगदंड, किरण साठे, वैष्णवी अग्रवाल आदी उपस्थित राहून त्यांनी वैद्यकीय तपासणी व व्यवस्थापनात सक्रिय सहकार्य के ले, अशी माहिती फाऊंडेशनचे प्रतिनिधी अक्षय लखाबरे यांनी दिली.
  • महिलांसाठी विशेष आरोग्य जनजागृती सत्रांचे आयोजन हे शिबिराचे वैशिष्ट्य ठरले. हीतेश्वरी मारबते यांनी मासिक पाळीविषयी सखोल मार्गदर्शन करत पाळीची सुरुवात,का लावधी, तारखेमधील बदलांची कारणे तसेच चाळिशीनंतर पाळी बंद होण्याविषयी माहिती दिली.
  • तोषीका यांनी स्तनाच्या कर्करोगाविषयी (ब्रेस्ट कॅन्सर) स त्र घेत त्याची प्राथमिक लक्षणे व घरच्या घरी स्वतःची तपा सणी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले.
  • राजेश्री यांनी PCOD व PCOS संदर्भात माहिती देत त्या ची लक्षणे ओळखून वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे मह त्त्व पटवून दिले.
  • तसेच डॉ.रश्मी बंगे यांनी ४० ते ५० वयोगटातील महिलां साठी हाडे मजबूत ठेवण्यासाठी नियमित व्यायामाचे मह त्त्व सांगून काही सोपे व्यायाम प्रत्यक्ष करून दाखवले. या बाबतची माहिती श्वेता पाटील यांनी दिली.
  • या आरोग्य शिबिरासाठी शहापूर तालुक्यातील आर्या हॉ स्पिटल यांनी मेडिकल किट स्वरूपात मदत केली.
  • तसेच प्रणव मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांनी आर्थिक स हकार्य केले. रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांनी औषध उप लब्धतेसाठी आर्थिक स्वरूपात मदत केली, अशी माहिती फाऊंडेशनचे खजिनदार प्रतीक जगताप यांनी दिली.
  • मोफत आरोग्य शिबिरामध्ये अस्मिता कहाळे, अर्पिता पि ळणकर, अर्जुन बनसोडे , गायत्री भांगरे, किसन विशे, वैभ व कुंभार,अभिषेक इंगळे, प्रसन्नजित कांबळे आणि शोभा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती संघट क गीता कुंभार यांनी दिली.
  • संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांनी परिश्र म घेतले. ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला असू न भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचा संक ल्प आयोजकांनी व्यक्त केला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles