आज वर्षातील पहिले ‘ब्लड मून’ चंद्रग्रहण; भारतातही दिसणार दर्शन.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-आज ३ मार्च २०२६ रोजी आकाशात एक दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे.
  • वर्षातील पहिले आणि पूर्ण (खग्रास) चंद्रग्रहण आज होत असून, या काळात चंद्र तांबूस रंगाचा म्हणजेच ‘ब्लड मून’ (Blood Moon) दिसणार आहे.
  • भारतीय हवामान विभागाने(IMD)दिलेल्या माहितीनुसार, हे ग्रहण भारतातील अनेक भागांतून दिसू शकणार आहे.
  • ग्रहणाची वेळ (भारतीय प्रमाणवेळेनुसार):
  • ग्रहणाची सुरुवात: दुपारी ३:२० वाजता.
  • खग्रास स्थिती (Totality): दुपारी ४:३४ ते ५:३३ पर्यंत.
  • ग्रहणाचा मोक्ष (समाप्ती): संध्याकाळी ६:४८ वाजता.
  • भारतात दृश्यमानता:
  • भारतात हे ग्रहण ‘चंद्रोदया’च्या वेळी दिसणार आहे. मुंबई, पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रात चंद्रोदय साधारण संध्याका ळी ६:२० ते ६:३० च्या दरम्यान होईल.
  • त्यामुळे नागरिकांना ग्रहणाचा शेवटचा टप्पा (साधारण १५-२० मिनिटे) उघड्या डोळ्यांनी पाहता येईल. ईशान्य भारत आणि अंदमान निकोबार बेटांवर हे ग्रहण अधिक स्पष्टपणे दिसेल.
  • सूतक काळ आणि धार्मिक महत्त्व:
  • धार्मिक मान्यतेनुसार, हे ग्रहण भारतात दिसत असल्याने त्याचा ‘सूतक काळ’ पहाटे ६:२० वाजल्यापासून सुरू झाला आहे.
  • सूतक काळात देवदर्शन आणि भोजन करणे टाळले जाते, विशेषतः गर्भवती महिलांना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles