
महावितरणचा ‘स्मार्ट’ दणका; पूर्वसूचना न देताच वीजपुरवठा खंडित, परंडा तालुक्यात ग्राहकांमध्ये तीव्र संताप.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- महावितरणने राज्यात बसवलेल्या नवीन ‘स्मार्ट मीटर’चा कारभार आता ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे.
- वीज बिल न भरल्यास कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता थेट वीजपुरवठा खंडित (Automatic Cut-off) केला जात असल्याने सर्वसामान्य ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

- काय आहे नेमका प्रकार?
- मिळालेल्या माहितीनुसार, ज्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत, तिथे बिल भरण्यास थोडाही विलंब झाला तर यंत्रणेद्वारे स्वयंचलित पद्धतीने वीज सफलाय आयोमिटिक कट होत आहे.
- विशेष म्हणजे, यासाठी महावितरणकडून ग्राहकांना कोणताही फोन, मेसेज किंवा लेखी सूचना दिली जात नाही.
- अचानक वीज गायब झाल्याने ग्राहकांना तांत्रिक बिघाड झाल्याचे वाटते, मात्र चौकशी केल्यावर बिल थकीत असल्याचे समोर येते.
- बिल भरल्यावरही २० मिनिटे ताटकळत…!
- केवळ वीज कापण्यावरच महावितरण थांबत नाही, तर बिल भरल्यानंतरही वीजपुरवठा तातडीने सुरू होत नाही. ऑनलाईन बिल भरल्यानंतर वीज पुन्हा सुरू होण्यासाठी किमान १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागत आहे.
- रात्री-अपरात्री किंवा कामाच्या वेळी अचानक वीज गेल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
- ग्राहकांचे आरोप:
- “महावितरणचा हा भोंगळ कारभार आहे. किमान २४ तास आधी कळवणे अपेक्षित आहे. डिजिटल इंडियाच्या नावाखाली ग्राहकांना वेठीस धरले जात आहे,” अशी भावना एका संतापलेल्या ग्राहकाने व्यक्त केली.
- स्मार्ट मीटरच्या या कार्यपद्धतीबद्दल ग्राहकांना पुरेशी माहिती किंवा प्रशिक्षण देण्यात महावितरण अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे.
- महावितरणने स्पष्टीकरण द्यावे:
- अचानक वीज कट झाल्याने ‘स्मार्ट’ पद्धतीमुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि घरून काम करणाऱ्या नोकरदारांचे मोठे नुकसान होत आहे.

- महावितरणने ही तांत्रिक सक्ती करण्यापूर्वी ग्राहकांना विश्वासात घेणे गरजेचे होते, अशी मागणी आता जोर धरत आहे.
- (स्मार्ट मिटर बसविताना ग्राहकाना विसवासात घेतले नाही महावितरणने मनमाने मिटर बसविले आहे.
- अधिकारी / कर्मच्यारी मुख्यालय राहत नाही / डेपीचे फीयूज गेले तर च्यार च्यार तास फीयूज बसवत नाही
- तरी देखील कर्मच्यारी अधिकारी यांच्यांवर नियंत्रण कोणा चे आहे..? नाही नेते मंडळी यांणा माहित आहे का..? नाही हे खेळ चाललय काय : शेख फारूक शेख )
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











