
दिव्यांग उद्योग समूह , महाराष्ट्र राज्य आयोजित ग्रामीण रुग्णालय परांडा येथे 55 दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :-तालुक्यातील दिव्यां ग व्यक्तीसाठी तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांगाना प्रमाणप त्र मिळावे , दिव्यांगांची होणारी हेळसांड थांबावी, दिव्यांग सेवा तालुक्यात मिळाव्यात या मागणीसाठी दिव्यांग उद्यो ग समूह या सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून परंडा शहर व तालुक्यातील दिव्यांग तपासणी शिबिर दिव्यांग अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न होत आहे.

- त्या अनुषंगाने आज दिनांक 6 मार्च 2026 वार शुक्रवार परंडा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले यामध्ये अस्तिव्यंग दिव्यांग 32 मतिमंद दिव्यांग 15 अंध दिव्यांग 8 अशा एकूण 55 दिव्यांग व्य क्तींची तपासणी करण्यात आली.

- या तपासणीसाठी धाराशिव येथील तज्ञ डॉक्टर सुहास शिं दे, डॉक्टर पवन महाजन ,डॉक्टर विनोद बर्वे यांनी काम काज पाहिले यावेळी परंडा उपजिल्हा रुग्णालयातील क र्मचारी अधिकारी यांनी सहकार्य केले.

- हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी दिव्यांग भाजपा आघाडी तालुकाध्यक्ष तानाजी घोडके, उत्तम शिंदे दिव्यांग उद्योग समूह तालुका अध्यक्ष तानाजी सांगडे, शहराध्यक्ष गोरख देशमाने पत्रकार फारुख शेख व इतर पदाधिकारी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











