
परंडा पंचायत समितीच्या सभापती पदी अर्चना जाधव तर उपसभापती पदी परशू गवारे यांच्या गळ्यात माळ.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- परंडा पंचायत समिती सभा पती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी सकाळी सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्या ची प्रक्रिया सुरू झाली.
- यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून तालुका प्रमुख आण्णा साहेब जाधव यांच्या पत्नी अर्चना जाधव यांनी व राष्ट्रवा दी काँगेसच्या मोनिका पाटील यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला.
- तर उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे परशू ग वारे व राष्ट्रवादी काँगेसच्या पंकज पाटील यांनी अर्ज दाख ल केले.
- सभापती व उपसभापती पदासाठी दोन दोन अर्ज आल्या ने ही निवड प्रक्रिया मतदान घेवून घ्यावी लागली.शिवसेना शिंदे गटाचे ६सदस्य असल्याने बहुमताचा आकडा त्यांच्या कडे होता.

- परंतु राष्ट्रवादी ने अवघे दोन सदस्य असताना देखील सभा पती व उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले परंतु बहु मत नसल्याने त्यांना तोंडघशी पडावे लागले.
- बहुमत असल्याने अर्चना आण्णासाहेब जाधव यांचा विज य नक्की होता त्यामुळे जाधव याच सभापती होणार असे मॅसेज देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

- दुपारी दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स भापती पदी अर्चना आण्णासाहेब जाधव व उपसभापती पदी परशू गवारे यांची निवड झाल्याचे जाहीर केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











