परंडा तहसील कार्यालयासमोर कंडारी येथील राजेंद्र पाटील यांचे आमरण उपोषण; चौथ्या दिवशीही प्रशासनाचे दुर्लक्ष.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :-येथील रहिवासी राजेंद्र उत्रेश्व र पाटील यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात प रंडा तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोष ण आज चौथ्या दिवशीही सुरू आहे.
  • धक्कादायक बाब म्हणजे, उपोषणकर्त्याची प्रकृती खाला वत असतानाही अद्याप प्रशासनातील कोणत्याही अधि काऱ्याने त्यांची साधी दखलही घेतलेली नाही, ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
  • काय आहे प्रकरण?
  • मिळालेल्या माहितीनुसार,कंडारी येथील राजेंद्र पाटील यां ची वैयक्तिक भिंत राहत्या घराचे भींत नामदेव देशमुख आ णि अतुल देशमुख या दोघांनी पाडली असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
  • या कृत्यामुळे आपले आर्थिक नुकसान झाले असून आप ल्याला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी वारंवार केली होती.
  • मात्र, स्थानिक स्तरावर दाद न मिळाल्याने त्यांनी अखेर तहसील कार्यालयासमोर उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
  • प्रशासकीय उदासीनता:
  • पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असूनही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही.
  • “जोपर्यंत मला न्याय मिळत नाही आणि संबंधितांवर कार वाई होत नाही, तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही,” अ सा पवित्रा राजेंद्र पाटील यांनी घेतला आहे.
  • उपोषणस्थळी अद्याप कोणीही फिरकले नसल्याने प्रशास नाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
  • आगामी काळात प्रकृती अधिक बिघडल्यास याला सर्व स्वी जबाबदार प्रशासन असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
  • आता तरी संबंधित अधिकारी जागे होऊन पाटील यांना न्याय देणार का…? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles