
श्रावणी आईनकर, शुभम किजबिले, साधना सुतार व्यावसायिक “अफलातून” या नाटकात झळकणार.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- लेखक दिग्दर्शक गणे श माळी यांच्या चौफेर वेबसिरीजमध्ये अभिनय करून क लाक्षेत्रात पदार्पण करणारे मंडणगड मधील कलाकार, श्रा वणी आईनकर, शुभम किजबिले आणि साधना सुतार सध्या प्रचंड चर्चेत आहेत. ते म्हणजे गणेश माळी लिखित दिग्दर्शित अफलातून या मराठी विनोदी व्यावसायिक नाट कामधून पदार्पण करण्याच्या तयारीत असल्यामुळे.
- सध्या त्यांची चौफेर वेबसिरीज प्रदर्शनाच्या वाटेवर असता ना हे तिन्ही कलाकार अफलातून नाटकात झळकणार अ सल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

- गणेश माळी यांच्या अभिनय तालमीत अभिनयाचे धडे घेत असताना हे तिन्ही कलाकार गणेश माळी यांचे आभा र मानतात.
- कोणतीही फी न घेता गणेश माळी सर्व कलाकारांना अग दी सहजरित्या अभिनय शिकवतात त्यांच्याकडे अभिनय शिकत आल्याचं समाधान आणि आनंद या कलाकारांनी व्यक्त केला. व अफलातून नाटकासाठी उत्सुक असल्याच सांगितलं.
- लवकरच या नाटकाचे प्रयोग रविवार १५ मार्च दुपारी ३. ३० वा. साहित्य संघ गिरगाव, २५ मार्च सायंकाळी ६ वा. श्रीकृष्ण सभागृह, मंडणगड, रविवार १२ एप्रिल, दु. ३.३० वा.साहित्य संघ मंदिर चर्नी रोड, मुंबई येथे होणारं असुन पुढे लागोपाठ अनेक प्रयोग होणार असल्याचे या कलाका रांनी सांगितले.
- विनोदी अभिनय खुपच अवघड असला तरी दिग्दर्शक ग णेश माळी तो सहज शिकवतात आणि विनोद करायलाही धमाल येते असं हे तिन्ही कलाकार आनंदाने सांगतात.
- मंडणगड तालुक्यातील श्रावणी आईनकर,शुभम किजबि ले, साधना सुतार यांनी त्यांच्या आईवडिलांचेही आभार मानले.

- घरच्यांच्या पाठिंबामुळे आम्हाला हे शक्य होत असल्याचे सांगितले व लेखक दिग्दर्शक गणेश माळी त्यांच्या पुढील अनेक प्रोजेक्टमधून आम्हाला संधी देतील.
- अशी आशा व्यक्त केली व अफलातून नाटकाच्या प्रयोगा ला प्रेक्षकांनी गर्दी करून शो हाऊसफुल्ल करावा असं त्यांनी प्रेक्षकांना आवाहन केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/










