परंडा तालुक्यातील लोणी येथे निसर्गाचा चमत्कार; खिल्लारी गाईने दिला जर्सी कालवडीला जन्म, वासरू पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील लोणी येथे एक आगळीवेगळी आणि विस्मयकारक घटना समोर आली आहे.
  • येथील एका खिल्लारी गाईने चक्क जर्सी जातीच्या काल वडीला जन्म दिल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला असून, हा ‘निसर्गाचा चमत्कार’ पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे.
  • सामान्यतः गाईला तिच्याच जातीचे वासरू होते, असा नि सर्गनियम आहे.
  • मात्र, लोणी येथील एका शेतकऱ्याच्या खिल्लारी गाईने जर्सी कालवडीला जन्म दिल्याचे समजताच संपूर्ण गावात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
  • हे वासरू दिसायला पूर्णपणे जर्सी जातीचे असून त्याचे रंगरूप आणि ठेवण खिल्लारी गाईपेक्षा वेगळी आहे.
  • ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच लोणीसह आसपास च्या गावांतील नागरिकांनी वासरू पाहण्यासाठी संबंधित शेतकऱ्याच्या गोठ्यात गर्दी केली.
  • पशुवैद्यकीय क्षेत्रात अशा घटना दुर्मिळ मानल्या जातात. काहींच्या मते हे कृत्रिम रेतनामुळे किंवा जनुकीय बदलां मुळे शक्य झाले असावे, मात्र ग्रामीण भागात याकडे कुतू हलाने आणि चमत्काराच्या भावनेने पाहिले जात आहे.
  • सध्या हे वासरू आणि गाय दोन्ही सुखरूप असून, या आ गळ्यावेगळ्या वासराची चर्चा संपूर्ण परंडा तालुक्यात रंगली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles