
ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील पडसाळी येथे २२ मार्चला मुडागड महोत्सवाचे आयोजन.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा तालुक्यातील पडसाळी येथील दुर्लक्षित नवदुर्ग मुडागडसह प्राचीन शिवमंदिराचे संवर्धन व्हावे.
- पडसाळी – काजिर्डा घाट रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा, पड साळी लघुपाटबंधारे तलावात बोटींग व्यवस्था व्हावी, राज र्षी शाहू महाराजांनी हत्ती संवर्धनासाठी वापरलेल्या चरांचे संवर्धन, त्यांनी बांधलेल्या अंबाबाई व हनुमान मंदिराचे जिर्णोध्दार, राजर्षी शाहू महाराज पुतळा सुशोभीकरण व परिसराचा पर्यटन विकास व्हावा.

- त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते त्यासाठी सर्वांची एकजूट महत्त्वाची आहे.
- म्हणूनच परिसरातील नागरिकांना एकत्रित करुन रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी मुडागड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
- सदर महोत्सवाचै आयोजन मुडागड महोत्सव समिती पड साळी – काजिर्डा घाट रस्ता कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
- असून दि. २२ रोजी स.७ वा. मुडागडावर श्रमदान, दु. ४ नं तर शोभा यात्रा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, शिवपालखीचे पूजन, सांस्कृतिक कार्यक्रम (पोवा डा, लेझीम, मर्दानी खेळ), महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्र म, सत्कार समारंभ आणि सायं ७ वा. महाप्रसाद होणार आहे.
- तरी शिवप्रेमी,गड प्रेमींनी या मुडागड महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











