मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव व इंदापूर बायपासची जनआक्रोश समितीकडून पाहणी.

  • प्रतिनिधी : रायगड : प्रमोद तरळ :- मुंबई -गोवा महामा र्गावरील माणगाव-इंदापूर दरम्यान रखडलेल्या कामाबाब त जनआक्रोश समितीच्या प्रतिनिधींनी माणगाव आणि इंदापूर बायपासची पाहणी केली.
  • या पाहणीदरम्यान संबंधित ठेकेदारांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून कामाच्या प्रगतीबाबत माहिती घेण्यात आली.
  • माणगाव बायपासच्या कामाबाबत ठेकेदारांनी सांगितले की कोणत्याही तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणी निर्मा ण झाल्या नाहीत.
  • तर ३१ मेपर्यंत बायपासची किमान एक बाजू वाहतुकीसा ठी सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या काम सुरू असून ते वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार ठेकेदारांनी व्यक्त केला.
  • मात्र इंदापूर बायपासचे काम अजूनही प्रतीक्षेतच आहे. काही कारणांमुळे या ठिकाणी अपेक्षित गतीने काम सुरू झालेले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.
  • तसेच ‘कोलेटी’ येथील काम सध्या पूर्णपणे बंद असल्याचे ही पाहणी दरम्यान निदर्शनास आले. हे काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्याची मागणी जनआक्रोश समितीने केली आहे.
  • मुंबई–गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून त्यामुळे कोकणातील नागरिकांना वाहतुकीच्या मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
  • त्यामुळे शासन, प्रशासन आणि ठेकेदारांनी कामाला गती देऊन हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा अशी अपेक्षा जनआक्रोश समितीने व्यक्त केली.
  • सदर निरीक्षण व पाहणी मोहिम दौरा जनआक्रोश समि तीचे अध्यक्ष श्री.अजयजी यादव, कार्याध्यक्ष-श्री.सुरेंद्र पवार, उपाध्यक्ष – श्री.अमोल चव्हाण आणि सल्लागार श्री.अरविंद तांबे यांच्या उपस्थितीत पार पडला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles