
‘राजापूरची राधा’ म्हणून प्रसिद्धीस आलेल्या श्री आई जाखादेवी कलामंच भालावलीच्या सायली भिंगेच्या अभिनयाची रसिक प्रेक्षकांना भुरळ.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-श्री.आई जाखादेवी कलामंच,मुंबई ( भालावली -राजापूर) यांच्या यंदा कोकण दौरा निमित्ताने दापोली, संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी, गुहाग र, पाली आणि वैभववाडी या तालुक्यात लोकप्रिय नमना चे कार्यक्रम होत आहेत.
- आता होणारे कार्यक्रम गुरुवार दि. ०२ एप्रिल २०२६, तळ वडे (राजापूर), शनिवार दि. ०९ मे २०२६, दापोली, रत्ना गिरी, मंगळवार दि. १२ मे २०२६ भालावली (राजापूर) तसेच मे महिन्यातील सार्वजनिक कार्यक्रमात यांचे नमन हमखास ठेवले जातात.
- रसिक प्रेक्षकांच्या आग्रहास्तव यंदा एप्रिल आणि मे महि न्यात बहुतांश कार्यक्रम हे कोकणातच आहेत.

- कार्यक्रमाचे खास वैशिट्य म्हणजे “राजापूरची राधा” साय ली भिंगे हिचा अभिनय पाहण्यास रसिक प्रेक्षक उत्सुक असतात.
- तसेच प्रसार माध्यमातून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. श्रीकृष्णाच्या भूमिकेत असणारे कु. पंकज कदम त्याचबरोबर संचिता सूद, शामल धायलकर, पायल दुर्गव ळी, मनस्वी गुरव, श्रावणी सावंत आणि अदिती गोनबरे या नृत्यांगनांचे नृत्य तसेच छोटी गौळण हिर्षा गुरव आणि दिव्यांशी शेंडेकर या केवळ ४ ते ६ वर्षाच्या असून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास यांचा सुद्धा तेवढाच सहभा ग असतो.
- विनोदी कलाकार साईराज सकपाळ, दीपेश भोवड,नितीन प्रभू हे देखील तेवढ्याच ताकदीने रसिक प्रेक्षकांचे मनोरं जन करतात.
- तसेच “जेव्हा येतो राजा, तेव्हाच येते मजा” म्हणजे अष्टपै लू कलाकार श्री.अंकित तळेकर यांची अफलातून भूमिका पाहण्यास रसिक प्रेक्षक अगदी शेवटपर्यंत कार्यक्रमाची मजा घेतात.
- तसेच सुमधुर आवाजाची गायिका मोनिका चव्हाण तसेच नवोदित गायिका सौ.आर्या गुरव तसेच गायक रवी सूद, सुयोग्य जोशी, श्रीपाद भोवड आणि इतर सहकारी यांची अदाकारी सुद्धा पाहण्याजोगे असते.
- लेखक/गीतकार : श्री.महेंद्र जोशी, दिगदर्शक : श्री. सचिन सांडये तसेच अध्यक्ष : भरत गुरव, उपाध्यक्ष- दीपक सांड ये, सल्लागार – सचिन शेंडेकर, सुजित जोशी, आणि इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम कोक णात सादर केला जातो.
- संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन श्री.विशाल गुरव आणि श्री.योगेश विखापे यांच्या मार्गदर्शनाने केले जाते. असे कलामंचचे सुत्रधार आणि सेक्रेटरी श्री विश्वास गुरव यांनी सांगितले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











