आबिटमध्ये ‘मासूम ‘च्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- दि.२३ मार्च २०२६ रोजी स काळी१० ते दुपारी २ वाजेपर्यंत आबिटगाव ग्रामपंचायती मध्ये ‘मासूम’ (महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ) पुणे यांच्या वतीने आरोग्य शिबीर घेण्यात आले.
  • मासूमच्या उपक्रमातील २ महिलांचा शारिरीक आणि भा वनिक आरोग्याचा अधिकार या अंतर्गत अँनिमिया मुक्त भारतच्या समर्थनार्थ हिमोग्लोबीनची तपासणी करण्यात आली.
  • ‘मासूम’ ची स्थापना डॉ.मनीषा गुप्ते आणि डॉ.रमेश अव स्थी यांनी १९८७ साली केली.त्यांनी लोकशाही, समानता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले.
  • त्यानंतर १९९१ मध्ये या संस्थेच्या माध्यमातून आरोग्यवि षयक कार्यक्रमाची सुरुवात केली.
  • समाजातल्या सर्वात वंचित आणि उपेक्षित घटकांना आरो ग्यसेवेचा लाभ घेता यावा आणि त्याची मागणी करता यावी यासाठी त्यांना सक्षम करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
  • भारतातील ‘आरोग्य हक्क चळवळीत ‘ ‘मासूम’चा सुरुवा तीपासून सक्रिय सहभाग राहिला आहे.
  • या संस्थेने कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे आ णि अहिल्यानगर या जिल्ह्यात संविधान संवर्धन फोलोशि प कार्यक्रम २०२२ ते २०२५ मध्ये राबविला आता कोक णातील जिल्ह्यात फेलोच्या माध्यमातून हा कार्यक्रम राब विण्यात येत आहे.
  • या संविधान संवर्धन फेलोशिप कार्यक्रमाचे प्रोजेक्ट लिडर मा. योगेश हुपरीकर यांच्या मार्गदर्शनाखालील होत आहे.
  • या हिमोग्लोबीन तपासणीला समाजसेवक मा.विलासजी भागोजी डिके व नर्स श्रद्धा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
  • या आरोग्य शिबीराला सरपंच श्री.सुहास भागडे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.या आरोग्य शिबीराला आरोग्यसेवक दिपक लिंगायत, CHO रुपाली गाडेकर, आरोग्यसेविका दिपिका भंडारी आणि आशासेविका भाग्यश्री भागडे इत्या दी मान्यवर उपस्थित होते.
  • हा हिमोग्लोबीनचा कार्यक्रम मासूम संस्थेचे फेलो (संविधा न संवादक) श्री.संदिप शंकर येलये यांनी आयोजित केला.
  • या आरोग्य शिबीरात हिमोग्लोबीन तपासून ज्याचे कमी आहे अशांना तीन महिन्याच्या आयरन च्या गोळ्या मोफत देण्यात आल्या.
  • या शिबीराचा फायदा आबिटगावातील होत महिलांना व समाजातील सर्व घटकांना होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles