
पाचल कोंडवाडीतील कु.आकांक्षा प्रमोद तेलंग हिची महाराष्ट्र पोलीस दलात निवड.
- प्रतिनिधी : पाचल : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्याती ल पूर्व भागातील पाचल कोंडवाडी येथील कु.आकांक्षा प्र मोद तेलंग हीची महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नियुक्ती झाली आहे.
- कु.आकांक्षा तेलंग हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा नं ५ येथे झाले असून माध्यमिक शिक्षण सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय पाचल येथे झाले असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तीने या यशाला गवसणी घातली आहे.

- कु.आकांक्षा हिची आई गृहिणी असून वडील खासगी कंप नीत नोकरी करतात एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मले ल्या आकांक्षाने लहानपणापासून पोलीस दलात भरती हो ण्याचे मोठे स्वप्न उराशी बाळगले होते.
- त्यासाठी तीने अथक परिश्रम घेतले नियमित अभ्यास, क ठोर परिश्रम आणि शारीरिक तयारीच्या जोरावर पोलीस दलात जाण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
- तीने मिळवलेल्या यशामुळे ती इतर युवतींना प्रेरणास्थान ठरली आहे. सध्या ती वडीलांसोबत वर्तक नगर ठाणे येथे वास्तव्यास आहे. कु.आकांक्षा हिचे पाचल पंचक्रोशी सह राजापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











