श्री.क्षेत्र टेरव येथे २ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेला रंगणार वार्षिक जत्रोत्सव.

  • प्रतिनिधी : चिपळूण : प्रमोद तरळ :- तालुक्यातील दस पटी विभागातील निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरव या पुरातन व सु प्रसिद्ध देवस्थानचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवी आणि कुल दैवत श्री कुलस्वामिनी भवानी देवी आहे.
  • श्री काळकाई देवी ही माहेरवाशिणींची रक्षणकर्ती देवी म्ह णून प्रसिद्ध आहे. तसेच जागृत आणि नवसाला पावणा ऱ्या देवता असा या देवतांचा लौकीक आहे.
  • शक्ती, युक्ती, बुद्धी व भक्ती यांचा अजोड मिलाप असले ल्या महाबली श्री हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेला साज रा करण्यात येतो, यंदा हा उत्सव गुरूवार दिनांक २ एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे.
  • श्री.भवानी वाघजाई व हनुमान मंदिराची अप्रतिम रंगरंगो टी करून मंदिर यात्रोत्सवासाठी सजविण्यात आले आहे.
  • सदर रंगकाम ज्येष्ठ आर्किटेक्ट श्री सतीश राव, सी.पी. एम.सी, मुंबई यांच्या सल्ल्याने व देखरेखीखाली ठेकेदार श्री अमित पारकर, आकार आविष्कार इन्फ्रा, मुंबई यांनी केले आहे.
  • चैत्र पौर्णिमेला रुढी परंपरेनुसार सूर्योदय झाल्यावर ब्राम्ह ण, मानकरी, ग्रामस्थ आणि पुजारी यांच्या उपस्थितीत मं दिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करतील.
  • दुपारी १२ वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोन्ही मानक री श्रीफळाच्या तीन जोड्या श्री कुलस्वामिनी भवानी मा तेसमोर ठेवून व गाऱ्हाणे घालून पुजारी ते श्रीफळ वाढव तील व प्रसाद म्हणून मानाप्रमाणे त्याचे वाटप करतील.
  • तसेच मंदिराच्या पोवळीबाहेर पूर्व दिशेस देवीचे देणे माग णे दिले जाईल. मंदिराच्या बाहेर पावट्याच्या घुगऱ्या व देवीच्या देण्या मागण्याचा प्रसाद दिला जाईल.
  • रुढी परंपरेनुसार पूजाविधी संपन्न झाल्यावर, पुजारी पाल खीत कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी या देवतांची रुपी लावतील.
  • शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा टेरव गावचा चैत्रपौ र्णिमा जत्रोत्सव म्हणजेच ग्रामस्थ, माहेरवाशिणी, चाकर मानी आणि भक्तांच्या आनंदाला उधाण आणणारा दिवस असतो.
  • चैत्र पौर्णिमे निमित्त पंचक्रोशीतील मौजे कामथे व चिंचघ री येथील पालख्यांचे मिरवणुकीने वाजतगाजत रात्रौ टेरव येथे आगमन होईल.
  • पालख्या विद्युत रोषणाईंनी तसेच विविध प्रकारच्या फुलां नी सजविलेल्या जातील. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत तिन्ही पालख्यांची मिरवणूक मंदिराकडे मार्गस्थ होईल.
  • तिन्ही पालख्या नाचत उंचावून एकमेकींना भेटतात ते दृ श्य विलोभनीय असते. मंदिरात तिन्ही पालख्या स्थानापन्न झाल्यावर दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी प्रचंड गर्दी होते.
  • त्यानंतर सालाबादप्रमाणे रात्रौ मनोरंजनात्मक कार्यक्रमा चे आयोजन केले जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही पालख्यांची पूजा व सन्मान केल्यावर आपआपल्या गावी मार्गस्थ होतील.
  • सदर वेळी श्री.क्षेत्र टेरवची पालखी मंदिराच्या उत्तरेच्या प्र वेशद्वारापर्यंत निरोप देण्यासाठी नेली जाईल आणि अशा प्रकारे जत्रोत्सवाची सांगता होईल.
  • तरी सर्व भाविक, चाकरमानी, माहेरवाशिणी व हितचिंतक यांनी वार्षिक जत्रोत्सवानिमित्त दर्शनाचा लाभ घ्यावा अ शी विनंती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles