
परंडा तालुक्यातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना ऑट्रॉसटी गुन्हा दाखल.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- तुला इथे शेती करू देणार नाही”; परंड्यात दलित शेतकऱ्याच्या शेतात तोडफोड,45 हजारांचे नुकसान जातीय द्वेषातून बोअर मध्ये दगड टाक ले, बावची येथिल थिटे यांच्यावर ऑट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल.
- जातीय द्वेषातून एका दलित शेतकऱ्याला लक्ष्य करून त्याच्या शेतातील पाइपलाइन, बोरवेल आणि सिंचन साहि त्याची तोडफोड केल्याची धक्कादायी घटणा परंडा तालू क्यात घडली आहे.
- DocScanner Mar 26, 2026 10-42 PM
- इतकेच नव्हे, तर “तुला इथे शेती करू देणार नाही” असे म्हणत जातीवाचक शिवीगाव आणि धमक्या दिल्याचा घटणा समोर आहे.
- या प्रकरणी बावची येथील रामचंद्र विक्रम थिटे यांच्यावि रोधात परंडा पोलिस ठाण्यात गुरुवारी दि २६ मार्च रोजी दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार — ऑट्रॉसिटी खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- मिळालेल्या माहितीनुसार, उमेश भास्कर सोनवणे यांनी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
- तक्रारीनुसार, त्यांच्या बाबची शिवारातील शेतात उसाचे पीक असून पाणी पुरवठ्यासाठी पाइपलाइन आणि बो रवेलची व्यवस्था करण्यात आली होती.
- शेजारी शेतकरी रामचंद्र थिटे यांनी सोनवणे यांच्या शेता तील पाईप लाईन चे अनेक वेळा तोडफोड करून नुक सान केले आहे,धक्कादायक बाब म्हणजे, ही पहिलीच घटना नसल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

- याआधीही अनेक वेळा पाइपलाइनचे जॉईंट, कॉक आणि सिंचन साहित्य तोडून नुकसान करण्यात केले व शेतक ऱ्याला पळऊन लावण्याचा प्रयत्न आला आहे.
- 26 मार्च रोजी शेतात शेतकरी सोनवणे गेल्यानंतर बोर मधून पाणी येत नसल्याने पाहणी केली असता, बोरचे पाइप, वायर आणि दोरी तोडलेली, तसेच बोरच्या पाइप मध्ये दगड आणि माती टाकून पाणीपुरवठा बंद केल्याचे दिसुन आले.

- या प्रकारात सुमारे 45 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
- नुकसान करून आरोपी पळून जात असताना सोनवणे यांनी स्वताः पाहिले आहे, या नुकसानीबाबत आरोपी कडे विचारणा केली असता, “माझ्या शेताशेजारी शेत घेण्याची तुझी लायकी नाही… तुला इथे शेती करू देणार नाही असे म्हणत जातीवाचक अपमान आणि धमक्या दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
- तसेच, इथे अठरा पगड जाती जमा झाल्या आहेत त्यांना इथून हाकलून लावणार” असे संतापजनक वक्तव्य केल्या चाही दावा तक्रारदाराने केला आहे.
- या गंभीर घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून,आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी माग णी जोर धरत आहे.

- एका दलित शेतकऱ्याच्या शेतीवर, पाण्यावर आणि उप जीविकेवरच घाला घालण्याचा प्रयत्न करण्यात आला असून,या प्रकरणात पोलिसांची पुढील कारवाई काय होते, याकडे आता संपूर्ण परंडा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











