
आवाटी येथे येत्या 30 मार्च सोमवारी हजरत बु अलीशाह कलंदर रह पानीपत यांच्या स्मरणार्थ उर्स कलंदर कार्यक्रमाचे आयोजन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- करमाळा तालुक्या तील आवाटी येथील हजरत चांद पाशा वली बाबा यांच्या दर्गाह मध्ये येत्या 30 मार्च 2026 (उर्दू 10 तारीख शवाल 1447) हिजरी सोमवारी पानीपत येथील हजरत बु अली शाह कलंदर रह. यांच्या स्मरणार्थ उर्स कलंदर कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती दर्गाह कमिटीचे अध्य क्ष हाजी कादर भाई तांबोळी तसेच बाबाचे खादिम गुलाम नबी कादरी तसेच इरफान कादरी यांनी बोलताना दिली.

- आवाटी येथील वली बाबा दर्गाह या ठिकाणी ऊर्स मुबार क निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
- यामध्ये बु अलीशाह कलंदर यांची गिलाफ चादर दर्शनासा ठी सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी नऊ वाजे पर्यंत राहणार आहे.

- याशिवाय संध्याकाळी ईशा नमाज नंतर महफिले समाचा कार्यक्रम होणार असल्याचे दर्गाह ट्रस्टच्या वतीने सांगण्या त आले आहे.
- सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने दर्गाहवर विविध रंगाची रोष णाई करण्यात आली असून आलेल्या भक्त गणांना पार्किं गची व्यवस्था करण्यात आली आहे.

- राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले हजरत वली चांद पा शा दर्गाहवर आजही विविध धर्माचे भाविक मोठ्या संख्ये ने येत असतात.
- दर्गाह वर आलेल्या भक्तगणांना महाप्रसाद लंगर खाना वा टपाचे कार्यक्रम ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे. या शिवाय या दर्गाहावर वर्षभरातून तीन धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहमय वातावरणात साजरे केले जातात.

- सदर धार्मिक कार्यक्रमाचा लाभ भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन दर्गाह ट्रस्टच्या वतीने सुफी हसनैन कादरी (स ज्जादा नशिन) तसेच आवाटी ग्रामस्थाच्या वतीने करण्या त आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











