वसई-विरारमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न; 150 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती.

  • प्रतिनिधी : वसई-विरार :- माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, वसई-विरार शहर जिल्हा यांच्या वतीने आयोजि त करण्यात आलेले कायदेविषयक जनजागृती व एक दिवसीय मार्गदर्शन/प्रशिक्षण शिबीर दि. 29 मार्च 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाले.
  • या शिबिरास राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिले. या शिबिरात माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत कलम 1 ते 31 पर्यंतची सखोल व मार्गदर्शक माहिती देण्यात आली.
  • माहिती अधिकाराचा प्रभावी वापर कसा करावा, अर्ज प्र क्रिया, प्रथम व द्वितीय अपील याबाबत मार्गदर्शन करण्या त आले.
  • यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाषजी बसवेकर यांनी उपस्थितांना अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
  • तसेच इतर महत्त्वाच्या कायद्यांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सविस्तर माहिती दिली. ग्राहक संरक्षण कायदा 2019 या विषयावर अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कोकण प्रांता चे संघटक श्री. राजेंद्र बंडगर यांनी मार्गदर्शन केले.
  • महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा 2015 या विषयावर श्री. महेश कदम यांनी नागरिकांना सेवा हक्क आणि प्रशासना स जाब विचारण्याबाबत मार्गदर्शन केले.
  • तसेच दप्तर दिरंगाई कायदा 2005 आणि अभिलेख जत न कायदा 1993 या विषयांवर श्री. नितीन राणे यांनी स विस्तर माहिती देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
  • सदर शिबीर दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आले होते. दोन्ही सत्रांमध्ये विविध कायद्यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले. शिबिराच्या शेवटी प्रश्नोत्तरांचा विशेष ता स ठेवण्यात आला होता.
  • या दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर अ चूक व अभ्यासपूर्ण प्रश्न विचारले असून, त्यांना वक्त्यां कडून समाधानकारक व मार्गदर्शक उत्तरे देण्यात आली.
  • या मार्गदर्शन शिबिरामध्ये नाशिक, मुंबई, पालघर, पनवेल, भिवंडी, खालापूर आदी ठिकाणांहून असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.
  • एकूण 150 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती. विशेष म्हणजे या शिबिरात महिला वर्गाचाही उत्स्फू र्त सहभाग दिसून आला.
  • तसेच या कार्यक्रमास संघटनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
  • त्यामध्ये कोकण परीक्षेत्र अध्यक्ष विजय खेतले (पत्रकार), ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक पडवळ, भिवंडी अध्यक्ष शां ताराम पाटील, मुंबई जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील, नारा यण घाडी, संदीप होडगे, अंबालाल कुंभार, नितेश पवार, प्राणेश शुक्ला, अनंत पाटील,प्रदीप नर, विश्वम्भर मडव, नारायण पुरोहित, राजमन विश्वकर्मा, अरविंद गावडे, रमण धामपलवार, माणिक कोठावडे, किशोर ठाकरे, श्रीनिवास मुळीक, प्रतीक चौधरी, हितेंद्र महाले, सुहास पांचाळ, ज या कदम, जस्मिन शेख, शुभांगी शिवगण, कल्पना खरपडे यांचा समावेश होता.
  • या शिबिरामुळे माहिती अधिकार तसेच इतर कायद्यांविष यी कार्यकर्त्यांमध्ये जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली असून, प्रशासनातील पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.
  • कार्यक्रमाचे आयोजन माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरे शन, वसई-विरार शहर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने क रण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्द ल आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles