परंडा तालुक्यातील कुभेफळ येथे हजरत गफूर बाबा आणि हजरत लालबाबा यांचा २१२ वा संदल सोहळा उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील कुभेफळ येथे हजरत गफूर बाबा आणि हजरत लालबाबा यांचा २१२ वा संदल मुबारक सोहळा २८ मार्च २०२६ रो जी अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला.
  • या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मि क आणि सामाजिक उपक्रमांनी सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवले.
  • पारंपारिक संदल मिरवणूक सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेली संदल मिरवणूक सायंकाळी ५ वाजता मुजावर बाडा येथून काढण्यात आली.
  • पारंपारिक पद्धतीने घोड्यावर पवित्र चादर ठेवून, वाजत-गाजत ही मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली.
  • मिरवणुकीनंतर दर्गा शरीफ येथे चादर चढवण्यात आली आणि फात्याखानी करून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
  • सामाजिक बांधिलकी: ८० जणांचे रक्तदान संदलचे औचि त्य साधून गावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन कर ण्यात आले होते.
  • यामध्ये ८० नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामा जिक बांधिलकी जपली. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्या ला आयोजकांच्या वतीने पाण्याच्या जारचे वाटप करून गौरविण्यात आले.
  • दोन दिवस लंगरचा आस्वाद उत्सवा निमित्त गावात २८ मार्चपासून सलग दोन दिवस लंगर (भोजन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. महिलां ची मोठी उपस्थिती या सोहळ्यासाठी कुभेफळ आणि प रिसरातील सर्व जाती-धर्माचे अबालवृद्ध व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
  • विशेषतः संदल दरम्यान होणारा ‘फकीरांचा खेळ’ पाहण्या साठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.
  • स्थानिक नागरिक आणि दर्गा कमिटीच्या नियोजनामुळे हा २१२ वा संदल सोहळा अत्यंत शांततेत आणि भक्तीम य वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles