
चैत्र वारीतील भाविकांच्या सेवेसाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टची ॲम्ब्युलन्स भांडुप वरुन पंढरपूरकडे रवाना.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- पंढरपूर येथील चैत्र वारी २०२६ यात्रेसाठी भांडुप वरून वैष्णव चारिटेबल व मेडिकल ट्रस्ट यांची ॲम्बुलन्स,डॉक्टर व सेवेकरी यांची ए क टीम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथे पाच दिव स + रात्र (२४ तास) सेवेसाठी प्रस्थान केले.

- यामध्ये मंदिरात व मंदिर परिसरात येणारी अत्यावश्यक से वा, येणाऱ्या भाविकांमध्ये कोणी आजारी पडल्यास त्यां च्यासाठी डॉक्टर व मोफत वैद्यकीय सेवा, इमर्जन्सी ॲम्बु लन्स सेवा उपलब्ध असते. दर्शन रांगेत २४ तास वैद्यकीय पथक उपलब्ध असते.
- दिनांक २६ मार्च २०२६ रोजी उत्कर्ष नगर लालाशेट कंपा ऊंड भांडुप येथे ॲम्ब्युलन्स पूजा व श्रीफळ अर्पण करून सेवेस प्रस्थान करण्यात आले.

- यावेळी प्रमुख उपस्थित मानाचे वारकरी जोडपे माननीय सौ.ज्योती अनिल राजभोज (नगरसेविका) माननीय श्री. अनिल राजभोज (समाजसेवक) व ट्रॅफिक पोलिस अधि कारी माननीय श्री.महेश तांबे सर, मा.श्री.वसंत मंडलिक महाराज तसेच सर्व भाविक मंडळी व सहकार्य करणाऱ्या सर्वाचे श्री.अशोक आहेर विश्वस्त- वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने आभार मानण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











