
दिलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष; गट विकास अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- ग्रामपंचायत अंतर्गत “आप ले सरकार सेवा केंद्र” संबंधित गंभीर अनियमिततेबाबत दिलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, जिल्हा धाराशिव यांनी गट विकास अधिकाऱ्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.
- या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव तसेच तह सीलदार, परंडा यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करण्या त आले आहे.
- महासंघाच्या निवेदनानुसार, ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असलेल्या ऑपरेटरकडून अधिकृत आयडीचा गैरवापर हो त असल्याची तक्रार दिनांक ५ मार्च २०२६ रोजी पंचायत समिती परंडाचे गट विकास अधिकारी श्री. विनोद जाधव यांच्याकडे पुराव्यासह लेखी स्वरूपात करण्यात आली होती.

- या आयडीच्या माध्यमातून परंडा शहरात दुकाने चालवून लाखो रुपयांचे व्यवहार करण्यात आल्याचा आरोप कर ण्यात आला आहे.
- तसेच, संबंधित व्यवहारांमधून मिळालेली रक्कम शासना च्या खात्यात जमा करण्यात आली आहे का, किती रक्क म जमा झाली, कोणती कामे करण्यात आली याची सखो ल चौकशी करण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली होती.
- मात्र, तक्रार दाखल करूनही बराच कालावधी उलटून गे ला असून अद्याप कोणतीही चौकशी किंवा कार्यवाही कर ण्यात आलेली नाही, असा आरोप महासंघाने केला आहे.
- महासंघाने पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या सेवा हमी कायद्यानुसार कोणत्याही गंभीर तक्रारीवर तत्काळ कारवाई करणे अपेक्षित असताना संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
- त्यामुळे हा प्रकार कर्तव्यात कसूर (Dereliction of duty) असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
- याशिवाय, “आपले सरकार सेवा केंद्र” व महा-ऑनलाइन प्रणालीतील व्यवहारांचा डेटा सुरक्षित ठेवण्याबाबतही प्र शासनाने स्पष्ट सूचना द्याव्यात, अन्यथा डेटा न मिळाल्या स त्याची जबाबदारी संबंधित ऑपरेटर व गट विकास अ धिकाऱ्यावर निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
- दरम्यान, या प्रकरणात तात्काळ चौकशीचे आदेश देऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या गट विकास अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कार वाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
- अन्यथा, महासंघाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन किंवा उपोषण छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
- या निवेदनासोबत ५ मार्च २०२६ रोजी दिलेल्या तक्रार अ र्जाची पावतीही जोडण्यात आली आहे. प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











