
हातिवले टोल नाक्यावर राजापूर तालुकावासियांना टोल माफी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथे टोल सुरु करण्याच्या हालचाली अत्यंत वेगाने सुरु झा ल्या आहेत.
- दरम्यान टोल नाका सुरु करायचा असेल तर आधी राजा पूर तालुक्यातील नागरिकांना प्रथम संपूर्ण टोलमाफी द्यावी.
- अशी मागणी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामा जिक कार्यकर्ते वाहन चालक, शेतकरी आणि नागरिकांनी केली आहे.

- तसे केले नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इ शारा देत याबाबतचे एक लेखी निवेदन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना हातिवले टोल नाका येथे देण्या त आले.
- रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती राजापूरातील हा तिवले येथे हे सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आले.
- सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या व प्रसंगी एकाकी लढणाऱ्या कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी अत्यंत प्रयासाने या आंदोलनासा ठी सर्वांना एकत्रित करुन या प्रश्नाला वाचा फोडली.
- महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण, निकृष्ट दर्जाचे असून अने क ठिकाणी अपघात होत असल्याने नाराजी व्यक्त कर ण्यात आली.
- भू-संपादन मोबदला, सर्व्हिस रोड, स्ट्रीट लाईट,बस स्टॉप, सुरक्षा सुविधा यासह अनेक कामे प्रलंबित असताना टोल वसुली करु नये अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
- हातिवले टोल नाक्यावरुन राजापूर शहरात दैनंदिन कामा साठी नागरिकांना वारंवार ये-जा करावी लागते.
- शाळा, महाविद्यालये, दवाखाने, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, बँका, पोस्ट तसेच बाजार पेठेतील दैनंदिन खरेदीसाठी नागरिकांना या रस्त्याचा वा पर करावा लागतो.
- अशा परिस्थितीत स्थानिक नागरिकांना सातत्याने टोल भ रणे शक्य नाही म्हणूनच स्थानिकांना टोल माफी द्यावी.
- जबरदस्तीने टोल लादण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोल न करु असा इशारा सर्वपक्षीय पदाधिकारी,वाहन चालक, ग्रामस्थ यांनी महामार्ग विभागाचे अधिकारी श्री कुमावत यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











