
परंड्यात डी.बी.ए. समूहाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयं तीनिमित्त परंडा येथे डी.बी.ए. (DBA) समूहाच्या वतीने द रवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन कर ण्यात आले आहे.
- समूहाचे संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे यां च्या अध्यक्षतेखाली कुर्डूवाडी रोडवरील संपर्क कार्यालया त झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

- येत्या १४ एप्रिल २०२६ रोजी परंडा येथील आठवडा बा जार परिसरात हा जयंती उत्सव साजरा होणार आहे.
- या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी ‘जयंती कमिटी’ ची निवड करण्यात आली असून, अध्यक्षपदी ॲड.दयानंद धेंडे तर उपाध्यक्षपदी महावीर बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
- सामाजिक उपक्रमांची रेलचेल केवळ उत्सवच नव्हे तर सामाजिक बांधीलकी जपत यावर्षी विविध उपक्रम राबव ले जाणार आहेत.
- यामध्ये प्रामुख्याने डी.बी.ए.बचत गट: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नवीन बचत गट स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

- मदत वाटप: निराधार महिलांना साड्यांचे वाटप आणि गर जू व हुशार विद्यार्थ्यांना स्कूल बॅग,वह्या, पेन आणि शालेय साहित्याचे वाटप केले जाईल.
- आरोग्य सेवा: रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप, इमारत व बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी, आरो ग्य सेवा कार्ड वाटप आणि शासकीय योजनांचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
- सांस्कृतिक कार्यक्रम: भीमगर्जना आणि बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आ योजन करण्यात आले आहे.

- या बैठकीला हरिभाऊ गोडगे, पिंटू कोळी, कमलाकर खैरे, आनंद बनसोडे, संस्कृत्य बनसोडे, बाळासाहेब बनसोडे, ध र्मराज नरोटे, कालिदास काशीद, नागेश थोरात, सूर्योदय सरवदे, सम्यक धेंडे,माऊली पाटील, दत्तात्रय पाटील, दादा कोळी यांच्यासह परंडा शहरातील बहुसंख्य भीमसैनिक व नागरिक उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






