
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘वंचित बहुजन आघाडी ’चे चूल मांडून आंदोलन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- धाराशिव (दिनांक –०६/०४/ २०२६) धाराशिव येथे गॅस तुटवडा व दरवाढी च्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहु जन आघाडीच्या वतीने चूल मांडून आंदोलन करण्यात आले.
- राज्यभर सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे दैनंदिन जीवना वर होत असलेल्या परिणामांविषयी प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

- ‘नरेंद्र,कब मिलेगा सिलेंडर’ या घोषणांद्वारे आंदोलनकर्त्यां नी सरकारचा निषेध केला. गॅस टंचाईमुळे स्वयंपाक घरा तील गॅस शेगड्या थंड पडल्या असून चहाच्या टपऱ्या व रस्त्यावरील खाद्य स्टॉल्स बंद पडल्याचे चित्र आहे.
- अनेकांना कोळसा व लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करू न गुजराण करावी लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

- दि.११ मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला इशारा आज खरा ठर त असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
- मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबे,हॉटेल व्यवसाय,चहाच्या टप ऱ्या,फूड स्टॉल्स,केटरिंग व्यवसाय तसेच एलपीजीवर चा लणाऱ्या रिक्षा आणि पेट्रोकेमिकल्स उद्योगांवर या टंचाई चा मोठा परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हाध्य क्ष धनंजय सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

- यावेळी निवासी जिल्हाधिकारी विद्याचरण कवडकर यांना महिलांनी चुलीवर केलेली भाकरी व हिरव्या मिरचीचा ठे चा भेट देण्यात आला.
- यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे,युवा आघाडीचे शितल चव्हाण,कामगार आघाडीचे सुधीर वाघमारे,फुले-आंबेडकर विद्वत सभेचे डॉ.अनंत देडगे,भारतीय बौद्ध महासभेचे विजय बनसोडे, गुणवंत सोनवणे,धनंजय वाघमारे,महासचिव नासीर शेख, उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे,महादेव ऐडके,रुस्तम पठाण, प्रसिद्धी प्रमुख कुंदन वाघमारे,कृष्णा शिनगारे,सुनिल वाघ मारे,शेखर बनसोडे,विकास बनसोडे,राहुल पोरे,किरण बन सोडे,इरशाद बागवान, तानाजी सोनवणे, बी.डी.शिंदे, मि लिंद रोकडे,जीवन कदम,रामभाऊ गायकवाड,गोविंद भंडा रे,विद्याताई वाघमारे,मंगलताई आव्हाड, सुरेखाताई गंगाव णे, बाबासाहेब वाघमारे, मिलिंद वाघमारे,गौतम गायकवा ड, सचिन राठोड,मुस्तफा फकीर,किरण गायकवाड, नंदकु मार हवळे,सचिन गायकवाड,आनंद गाडे,अशोक कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






