
बार्शी येथे महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम संपन्न.
- प्रतिनिधी : परडा : फारूक शेख :- बार्शी जिल्हा सोला पूर दि 5 एप्रिल 2026 वृक्ष संवर्धन समिती,बार्शी जिल्हा सोलापूर तर्फे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योति बा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज बार्शी येथील पुतळा पार्क येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
- यावेळी वृक्ष संवर्धन समिती च्या सदस्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन महामानवाना आदरांजली वाहिली.
- मागील पाच वर्षापासून वृक्ष संवर्धन समिती मार्फत महा पुरुषांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवून त्यांना अभिवादन केले जाते.
- याप्रसंगी श्रमदाते म्हणून उमेश काळे, दयानंद रेवडकर, अ विराज रेवडकर,डॉ.सचिन चव्हाण, राजवर्धन चव्हाण,शौर्य नवले, अभिजित बोबडे, अक्षय घोडके, संतोषकुमार गाय कवाड, बाबासाहेब बारकुल, राणा दादा देशमुख, सचिन मस्के, योगेश गाडे, सायरा मुल्ला, दिपाली उकिरडे, सुनीता गायकवाड, अख्तर शेख, अक्षय भुईटे, चंद्रकांत उलभगत, परशुराम कांबळे, लंकाबाई बोकेफोडे, मोहम्मद शेख, व सर्व वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य उपस्थित होते.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






